October 19, 2025

Pune: मुकुंदनगर परिसरातील दर्ग्याला सकल हिंदू समाजाच विरोध…तर स्थानिकांचा मोर्चाला विरोध

पुणे, ०२/०८/२०२५: पुणे शहरातील मुकुंदनगर परिसरात असलेली दर्गा ही अनधिकृत असून या दुर्गावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात यासाठी आज आमदार संग्राम जगताप आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मुकुंदनगर परिसरात मोर्चा काढण्यात आला तर दुसऱ्याबाजूला या मोर्चेला स्थानिकांनी विरोध करत आम्हा स्थानिकांचा या दर्ग्याला कोणतंही विरोध नसल्याचं यावेळी येथील स्थानिकांनी सांगितल.

सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मुकुंदनगर परिसरात असलेली दर्गा ही अनधिकृत असून याच्यावर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आलं होतं.यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

यावेळी मुकुंदनगर परिसरातील स्थानिक नागरिक सीमा महाडिक म्हणाल्या की मी येथील स्थानिक नागरिक असून इथ आम्ही लहानातील मोठे झाले असून मी जन्मल्यापासून हा धार्मिक स्थळ बघत आहे.तसेच जरी मी हिंदू धर्मीय असले तरी मी मुस्लिम धर्मीय विरोधी नाही.या दर्ग्याला आम्हा स्थानिक नागरिकांचं विरोध नसून आंदोलन करणारे हे बाहेरचे आहे.आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन आहे की त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हा हिंदू मुस्लिम भावांना एकत्रित इथ राहू द्या.कृपया धार्मिक तेढ निर्माण करून द्वेष पसरवण्याचं काम करू नये आमच्या परिसरात आम्ही सर्वधर्मीय एकतेने राहत असून आमच्यातील हा एकोपा असच राहू द्या अस यावेळी त्यांनी सांगितल.