पुणे, ०५/०८/२०२५: खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट येत्या ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाला हिंदू महासंघाने विरोध केलं असून याबाबत त्यांनी आत्ता सेन्सॉर बोर्डला कायदेशीर नोटीस पाठवत या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.तसेच आत्ता हा चित्रपट पुण्यात एकही थेटर मध्ये दाखविल जाणार नसल्याची माहिती हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केलं आहे.
खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही दावे तसेच ट्रेलर मध्ये दाखविण्यात आलेले जे संदर्भ आहे त्यावर हिंदू महासभेने आक्षेप घेतले आहे आणि त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच निर्मात्याला पत्र देखील पाठवले आहे.
याबाबत हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की आमचं या चित्रपटाच्या नावापासूनच विरोध आहे.खालिद का शिवाजी हा काय प्रकार असतो हाच आम्हाला कळलेला नाही.आमची विनंती आहेकी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना देण्यात याव्या नाही तर आम्ही थेटर च्या आत येऊन अफझल वधावर व्याख्यान देऊ तसेच चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये दाखविण्यात आलं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 % मुस्लिम होते, त्यांचे 18 अंगरक्षक हे मुस्लिम होते आणि महाराजांनी किल्ल्यावर मशिदी बांधल्या असे अकलेचे तारे तोडणारा तसच खरा राजा तो असतो ज्याचा कोणताही मजहब नसतो तर जो जगाचा मजहब मानतो अशी मांडणी करणारा आणि साक्षात छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या या चित्रपटला प्रदर्शित होऊ देण म्हणजे खोट्या इतिहासाला मान्यता देण आहे.हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आम्ही सेन्सर बोर्डाला तशी कायदेशीर नोटीस आम्ही पाठवली असून तसे पत्र सुद्धा गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांना दिल आहे.त्या नंतर सुद्धा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याची जवाबदारी सेन्सर बोर्ड च्या अधिकाऱ्यांवर असेल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
More Stories
पुण्यात प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात जोरदार मोर्चा
“जैन धर्माच्या पवित्र जागेचा सौदा – ट्रस्टकडून बिल्डरच्या घशात जमीन घालण्याचा डाव!”
Pune: उंड्रीमध्ये एका सदनिकेत आगीची घटना; एक मृत तर पाच जखमी