October 7, 2025

Pune: मनसेतर्फे महापालिका आयुक्तांच्या केबिन बाहेर आंदोलन….आंदोलकांना अटक….उद्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन

पुणे, ६/०८/२०२५: पुणे शहरातील घोले रोड येथे असलेल्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातूनच महागडी झुंबरे, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाली असून याबाबत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाळली असून याबाबत तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही.याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळकडून महापालिका आयुक्त बंगल्यावरील वस्तू चोरी गेल्या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेल असता त्यावेळी महापालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यांना घरात घुसून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला असून काही काम मनसेकडून आयुक्तांच्या केबिन बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब झाल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते किशोर शिंदे त्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन आयुक्तांच्या केबिन मध्ये गेले असता पुणे महानगर पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मनसे शिष्टमंडळास दमदाटी करून घरात घुसू मारणार किशोर शिंदे याना गुंड म्हणून तुला महाराष्ट्राच्या बाहेर फेकतो असा दम दिल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन केलं काही काळ हे ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.यावेळी महापालिकेत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत महापालिका आयुक्तनवलकिशोर राम म्हणाले की माझी मीटिंग सुरू असताना अचानकपणे तीन चार लोक भेटले.ते कसे आले मला माहिती नाही कुठलेही कारण नसताना आत घुसून मला बोलायला लागले आणि माझ काम सुरू असताना त्यांनी वाद घातला आहे.आंदोलकांना मी कुठलीही धमकी दिली नाही.माझी बैठक सुरू असताना ते अचानक आले असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.आणि याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच महापालिका आयुक्तांच्या घरी काही गोष्टी गायब झाल्या असेल तर नक्कीच याची चौकशी केली जाईल असं यावेळी ते म्हणाले.

यावेळी पुणे महापालिका आयुक्त याच्यासोबत मनसे नेते बाबू वागस्कर आणि रणजित शिरोळे यांनी देखील चर्चा केली असून जवळपास एक तासापेक्षा जास्त काळ मनसे कार्यकर्तेकडून महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

याबाबत मनसे नेते किशोर शिंदे म्हणाले की मला घरात घुसून मारण्याची भाषा महापालिकेच्या आयुक्तांनी केली आहे.आम्हाला आयुक्तांना निवेदन द्यायचं होत आणि दरवाजा उघडून जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितल की तू कोण आहे बाहेर हो यावर मी त्यांना सांगितल की मी दहा वर्ष नगरसेवक राहिलो असून चार वेळा आमदारकी लढवली आहे.यावर ते आक्रमक झाले आणि तू कोण तुला घरात घुसून मारतो अशी धमकी दिली अशी भाषा ही महापालिकेच्या आयुक्तांना शोभत नसून आम्ही त्यांच्या निषेध करण्यासाठी आंदोलन केलं आहे.तसेच त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं अशी आमची मागणी असल्याचं यावेळी शिंदे म्हणाले.