पुणे, २१/०८/२०२५: महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून मान्यता दिली आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळात पुण्यामध्ये देशातूनच नाही, तर जगभरातून भाविक दर्शनासाठी आणि गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी येत असतात.
या वर्षी विशेष बाब म्हणजे पुणे मेट्रोची प्रवासी सेवा जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गावर सुरु झाली आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट ही पुण्याच्या मध्यवस्तीत असलेली स्थानके सुरु झाली आहेत. याच स्थानकांच्या सभोवताली शहरातील प्रमुख गणपती मंडळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात मध्यवस्तीतील वाहतूक कोंडी टाळून थेट मंडई, कसबा पेठ या भागात पोहचता येणार आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक ०६/०९/२०२५ सकाळी ६ ते दुसऱ्या ०७/०९/२०२५ दिवशी रात्री ११ पर्यंत मेट्रो सेवा ४१ तास अखंड सुरु असणार आहे. दिनांक २७/०८/२०२५ ते २९/०८/२०२५ या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसात मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सुरु असेल (नियमित वेळेत). दिनांक ३०/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ या दिवसात मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत सुरु असेल
अनु. क्र. दिनांक मेट्रोच्या प्रवासी सेवेची वेळ प्रवासी सेवेचे एकूण वेळ
१ २७/०८/२०२५ ते २९/०८/२०२५ सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत
(नियमित वेळेत) १७
२ ३०/०८/२०२५ ते ०५/०९/२०२५ सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत २०
२ ०६/०९/२०२५ ते ०७/०९/२०२५ सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत ४१
दिनांक ०८/०९/२०२५ पासून मेट्रो सेवा नियमित सुरु राहील
महाराष्ट्र राज्योत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांनी मेट्रो सेवेचा लाभ घ्यावा

More Stories
पुणे: महापालिका निवडणुकीत महायुतीचा दावा; पण मित्रपक्षांची स्वबळावरची मोहीम गतीत
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन