September 11, 2025

Pune: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुणेरी मेट्रोची हिंजवडी बाहेर ‘ट्रायल रन’ यशस्वी

हिंजवडी, २७/०८/२०२५: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोने माण डेपो ते म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलापर्यंत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पुणे मेट्रोची आणखी एक चाचणी (ट्रायल रन) यशस्वीपणे पूर्ण झाली.

यापूर्वी मेट्रोच्या एकूण तीन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या परंतु त्या सर्व चाचण्या माण ते हिंजवडी हद्दीतच घेण्यात आल्या होत्या.
आज पहिल्यांदाच हिंजवडीच्या हद्दीबाहेर मेट्रोने धाव घेतली. माण डेपो पासून ते म्हाळुंगे-बालेवाडी क्रिडा संकुलाजवळील स्टेशन क्रमांक १० पर्यंत ही यशस्वी चाचणी पार पडली. यावेळी मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.