पुणे, १६ सप्टेंबर २०२५ ः पुणेकरांना लवकरच दुहेरी मजल्याची म्हणजेच ‘डबल डेकर’ बसचा अनुभव घेता येणार आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच अत्याधुनिक वातानुकूलित आणि संपूर्णपणे इलेक्ट्रिक अशा डबल डेकर बसचा समावेश होणार आहे. या बसचा ट्रायल रन सध्या सुरू असून, येत्या आठ ते पंधरा दिवसांपर्यंत तो सुरू राहणार आहे.
ही बस स्विच मोबिलिटी कंपनीची असून तिची एकूण किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. पूर्णतः वातानुकूलित आणि इलेक्ट्रिक असलेल्या या बसमध्ये ६० आसन क्षमता आणि २५ उभ्या प्रवाशांसाठी जागा असून एकूण ८५ प्रवाशांची वाहतूक क्षमता आहे.
बसचे परिमाण :
उंची: ४.७५ मीटर
रुंदी: २.६ मीटर
लांबी: ९.५ मीटर
प्रारंभीच्या टप्प्यात दहा डबल डेकर बस पुण्यात आणण्याचे नियोजन आहे. या बस शहरातील मुख्य मार्गांवर धावतील अशी शक्यता आहे. सार्वजनिक वाहतुकीला नवा चेहरा मिळावा आणि प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
या नव्या बसच्या आगमनामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत आधुनिकतेची भर पडणार आहे. ट्रायलनंतर या बस कशा मार्गांवर आणि कुठून चालवल्या जातील, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार