September 20, 2025

अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय

पुणे, 17 सप्टेंबर 2025: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स या संघांनी आपापल्या
प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात हॉक्स संघाने इम्पेरियल स्वान्स संघाचा 4-3 असा पराभव करून पहिला विजय मिळवला. विजयी संघाकडून अनिश राणे, अर्जुन खानविलकर, चिन्मय जोशी, राधिका इंगळहळीकर, अक्षय ओक, अनुज मेहता, अभिषेक ताम्हाणे, यश मेहेंदळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात फाल्कन्स ऑप्टिमा संघाने बॉबकॅट्स संघावर 5-2 असा सहज विजय मिळवला. फाल्कन्स ऑप्टिमा संघाकडून अमित देवधर, सारंग आठवले, अभिजित राजवाडे, रणजित पांडे, सारा नवरे, वेदांत खटोड, हृषिता खुर्जेकर, संदीप साठे, इरा आपटे, शार्दूल वाळिंबे यांनी अफलातून खेळी केली.

स्पिअर्स संघाने किंगफिशर्स संघाचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून पहिला विजय मिळवला. स्पिअर्स संघाकडून अमोल मेहेंदळे, जितेंद्र केळकर, ईशा साठे, विश्वास मोकाशी, ईशान पारेख, गोपिका किंजवडेकर, अनिरुद्ध रांजेकर, ऋषिकेश पेंडसे यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या लढतीत सनबर्ड्स संघाने रेव्हन्स संघाचा 4-3 असा पराभव केला.

निकाल: साखळी फेरी: वरिष्ठ गट:
हॉक्स वि.वि. इम्पेरियल स्वान्स 4-3(खुला दुहेरी 1: अनिश राणे/अर्जुन
खानविलकर वि.वि.समीर जालन/विमल हंसराज 21-14, 21-08; खुला दुहेरी 2:
हेमंत पालांडे/पराग चोपडा पराभुत वि.अजय पटवर्धन/सचिन जोशी 16-21,
21-19, 10-15; मिश्र दुहेरी 1: चिन्मय जोशी/राधिका इंगळहळीकर
वि.वि.राजश्री भावे/तन्मय आगाशे 21-15, 14-21, 15-14; खुला दुहेरी 3:
अक्षय ओक/अनुज मेहता वि.वि.आनंद घाटे/विनीत रुकारी 21-14, 21-14, 21-14;
मिश्र दुहेरी 2: वरद चितळे/रिशीका आपटे पराभुत वि. सोहम कांगो/नेहा लागू
12-21, 21-18, 09-15; खुला दुहेरी 4: अभिषेक ताम्हाणे/यश मेहेंदळे वि.वि.
रोहन जोशी/वेदांत धाम 21-10, 21-07; खुला दुहेरी 5: अभिजीत
खानविलकर/सिद्धांत खिंवसरा पराभुत वि.आदित्य काळे/अश्विन शहा 15-21,
14-21);

फाल्कन्स ऑप्टिमा वि.वि.बॉबकॅट्स 5-2(खुला दुहेरी: अमित देवधर/सारंग
आठवले वि.वि.सोहम गाडगीळ/तेजस किंजवडेकर 21-14, 21-17; खुला दुहेरी 2:
अभिजित राजवाडे/रणजित पांडे वि.वि.बिपीन चोभे/तुषार नगरकर 21-16, 21-15;
मिश्र दुहेरी 1: सारा नवरे/वेदांत खटोड वि.वि.अदिती रोडे/रोहित मेहेंदळे
21-15, 21-13; खुला दुहेरी 3: हृषिता खुर्जेकर/संदीप साठे वि.वि.इशांत
रेगे/नचिकेत देवधर 21-12, 21-16; मिश्र दुहेरी 2:इरा आपटे/शार्दूल
वाळिंबे वि.वि.आशिष राठी/लक्ष्मी बेहेरे 21-10, 21-04; खुला दुहेरी 4:
पार्थ किल्लेदार/राजवीर बोरावके पराभुत वि.देवेन शेवाळे/नकुल बेलवलकर
06-21, 16-21; खुला दुहेरी 5: जयकांत वैद्य/नीरज दांडेकर पराभूत
वि.अश्विन जोशी/सिद्धार्थ साठे 12-21, 09-21);

सनबर्ड्स वि.वि.रेव्हन्स 4-3(खुला दुहेरी 1: देवेंद्र चितळे/सुधांशू
मेडसीकर पराभुत वि. केदार नाडगोंडे/प्रतीक धर्माधिकारी 13-21, 10-21;
खुला दुहेरी 2: नितीन कोनकर/प्रशांत वैद्य वि.वि.आनंद शहा/देवेंद्र राठी
21-12, 21-18; मिश्र दुहेरी 1: प्रीती फडके/मनोज गोरे पराभुत वि. दिप्ती
सरदेसाई/यश काळे 11-21, 09-21; खुला दुहेरी 3: ईशान कुदळे/श्रेयस भामरे
वि.वि.आमोद प्रधान/चिन्मय चिरपूटकर 21-06, 21-04; मिश्र दुहेरी 2: निधी
चितळे/आदित्य अभ्यंकर वि.वि.पिनाकीन मराठे/तेजस्विनी मराठे 21-06, 21-04;
खुला दुहेरी 4: प्रणित आठवले/उज्वल जोशी पराभुत वि. निलेश बजाज/रोहित
साठे 05-21, 08-21; खुला दुहेरी 5: गंधार देशपांडे/तन्मय चोभे
वि.वि.सिद्धार्थ निवसरकर/योहान खिंवसरा 21-18, 18-21, 15-12);

स्पिअर्स वि.वि.किंगफिशर्स 4-3(खुला दुहेरी 1: ईशान लागू/हर्षद जोगाईकर
पराभुत वि. आर्य देवधर/मिहिर आपटे 18-21, 18-21; खुला दुहेरी 2: अमोल
मेहेंदळे/जितेंद्र केळकर वि.वि.गिरीश खिंवसरा/श्रीदत शानबाग 21-20,
21-17; मिश्र दुहेरी 1: ईशा साठे/विश्वास मोकाशी वि.वि.चैत्रा आपटे/मंदार
विंझे 21-09, 21-16; खुला दुहेरी 3: आदित्य जितकर/नचिकेत जोशी पराभुत वि.
गिरीश मुजुमदार/कपिल बाफना 10-21, 21-07, 10-15; मिश्र दुहेरी 2: ईशान
पारेख/गोपिका किंजवडेकर वि.वि.अनय इंगळहळीकर/सुचित्रा जोशी 21-09, 21-05;
खुला दुहेरी 4: आदित्य दिवेकर/मेघ तायडे पराभुत वि.आर्यन सुतार/तनिष
बेळगळकर 09-21, 06-21; खुला दुहेरी 5: अनिरुद्ध रांजेकर/ऋषिकेश पेंडसे
वि.वि.कुणाल शहा/सौमित्र करंदीकर 21-10, 21-08))