December 2, 2025

महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; परीक्षा आता २२ फेब्रुवारी २०२६ रोजी

पुणे, २५ नोव्हेंबर २०२५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा राज्यभर २२ फेब्रुवारी २०२६ रोजी एकाच दिवशी घेतली जाणार आहे.

यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) असल्याने आणि राज्यातील मोठ्या संख्येने प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

ही सुधारित तारीख सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शाळांनी आणि संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.