December 2, 2025

एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत मयंक राजन, रोहन बजाज, रिशीता यादव, स्वरा जावळे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे,दि.26 नोव्हेंबर 2025: ऐम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज (16 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात रिशीता यादव, स्वरा जावळे यांनी तर मुलांच्या गटात रोहन बजाज, मयंक राजन, रुणमन महेश या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात सातव्या मानांकित मयंक राजन याने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित आर्यन कीर्तनेचा 6-2, 7-5 असा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. क्वालिफायर रोहन बजाज याने पाचव्या मानांकित भार्गव वैद्यचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. चुरशीच्या लढतीत स्मित उंद्रेने नमिश हूडचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 3-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला.कर्नाटकच्या रुणमन महेश याने तमिळनाडूच्या चौथ्या मानांकित गौतम व्यंकटेश बीचे आव्हान 6-2, 6-1 असे मोडीत काढले.

मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकित रिशीता यादव हिने कर्नाटकाच्या अव्वल मानांकित धन्वी बोपण्णाचा 3-6, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळवणाऱ्या स्वरा जावळे हिने सातव्या मानांकित रित्सा कोंडकरचा 6-1, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. नवल शेख हिने स्वरा पवारचा 1-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. जान्हवी सावंत हिने सान्वी राजूचा 6-7(3), 6-2, 1-2 असा पराभव केला.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या गौतम व्यंकटेश बी व महाराष्ट्राच्या आर्यन कीर्तने यांनी महाराष्ट्राच्या अनन्य गांधी व भार्गव वैद्य यांचा 6-1, 6-1 असा तर, अमोघ पाटील व नीरज जोर्वेकर या जोडीने प्रत्युश बगाडे व शौर्य गडदे यांचा 6-1, 7-5 असा पराभव केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
मयंक राजन(7)([मध्यप्रदेश)वि.वि.आर्यन कीर्तने(1)(महाराष्ट्र)6-2, 7-5;
रुणमन महेश(कर्नाटक)वि.वि.गौतम व्यंकटेश बी(4)(तामिळनाडू)6-2, 6-1;
स्मित उंद्रे(महाराष्ट्र)वि.वि.नमिश हूड (महाराष्ट्र)7-6(5), 3-6, 6-2;
रोहन बजाज (महाराष्ट्र)वि.वि.भार्गव वैद्य(5)(महाराष्ट्र) 6-0, 6-2;

मुली:
रिशीता यादव (महाराष्ट्र)वि.वि.धन्वी बोपण्णा(1)(कर्नाटक)3-6, 6-1, 6-4;
नवल शेख(महाराष्ट्र)वि.वि.स्वरा पवार(महाराष्ट्र) 1-6, 6-3, 6-4;
स्वरा जावळे(महाराष्ट्र)वि.वि.रित्सा कोंडकर(महाराष्ट्र)6-1, 6-4;
जान्हवी सावंत (महाराष्ट्र)वि.वि.सान्वी राजू(महाराष्ट्र)6-7(3), 6-2, 1-2 सामना सोडून दिला;

दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
गौतम व्यंकटेश बी(तामिळनाडू)/आर्यन कीर्तने(महाराष्ट्र)(1) वि.वि.अनन्य गांधी (महाराष्ट्र)/भार्गव वैद्य(महाराष्ट्र)6-1, 6-1;
अमोघ पाटील/नीरज जोर्वेकर(महाराष्ट्र) वि.वि.प्रत्युश बगाडे/शौर्य गडदे(महाराष्ट्र) 6-1, 7-5;
मयंक राजन (मध्यप्रदेश)/ आदित्य योगी (महाराष्ट्र) वि.वि. स्मित उंद्रे/वीर चतुर(महाराष्ट्र) 7-6(3), 6-2;
सौमित्र किर्दत(महाराष्ट्र)/सोहम रणसुभे(महाराष्ट्र) वि.वि.अरिन कोटणीस/आर्यन बॅनर्जी(महाराष्ट्र) 6-4, 6-4;

मुली:
धन्वी बोपण्णा(1)(कर्नाटक)/रितू ग्यान(महाराष्ट्र) वि.वि. ओवी मारणे/स्वरा जावळे(महाराष्ट्र) 6-3, 6-4;
रिशिता यादव/जान्हवी सावंत(महाराष्ट्र) वि.वि. शर्मिष्ठा कोद्रे/परी हेलेंगे(महाराष्ट्र) 6-0, 4-6, 10-5;
वाण्या अग्रवाल/अन्वी चिटणीस(महाराष्ट्र) वि.वि.सारा हकीम/नवल शेख(महाराष्ट्र) 6-4, 6-3;
प्रिशा पाटील/अनिका नायर(महाराष्ट्र) वि.वि.स्वरा पवार/शरण्या सावंत(महाराष्ट्र)6-2, 7-5.