December 7, 2025

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा; बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप

पुणे, ६ डिसेंबर २०२५ ः युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा करत उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बीसीसीआय मानकांनुसार देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट सेटअप म्हणून ही अकॅडमी विकसित केली जाणार असून, जागतिक दर्जाचे सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याचे बालन यांनी सांगितले.

अकॅडमीसाठी सिंहगड कॉलेज, वडगाव आणि लोणावळा येथील क्रिकेट मैदानांची निवड करण्यात आली असून, येथील सर्व सुविधांचे उन्नतीकरण बीसीसीआय मानकांनुसार केले जात आहे. पुढील सिझनपासून या मैदानांवर बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

प्रवेश १ जानेवारीपासून; कोचिंग १५ जानेवारीपासून
अकॅडमीमध्ये बीसीसीआय प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार असून,
१ जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल
१५ जानेवारीपासून प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे

ही संपूर्णपणे व्यावसायिक अकॅडमी असल्याने प्रवेश मर्यादित असणार आहेत, असे बालन यांनी स्पष्ट केले.

सर्व ऋतूंमध्ये प्रशिक्षण अखंडित सुरू राहावे, यासाठी प्रत्येक मैदानावर इनडोअर ३ विकेट्सची सुविधा उपलब्ध असेल.
तसेच –
बाहेरगावच्या खेळाडूंसाठी होस्टेल
व्यायामशाळा
जलतरण तलाव
फिटनेस कोचिंग
अशा सुविधा संपूर्णपणे उपलब्ध असतील.
खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी स्पोर्ट्स कंडिशनिंग आणि फिटनेस ट्रेनिंगचे विशेष मॉड्युल्सही राबवले जातील.

महिला क्रिकेटपटूंकरिता स्वतंत्र बॅचेस

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस ठेवण्यात आल्या असून, त्यांना सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाईल.

स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी

अकॅडमीतील उत्कृष्ट खेळाडूंना पीबीजी ज्युडिशियल क्रिकेट क्लबमार्फत विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.

याबाबत पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचे पुनीत बालन म्हणाले, “पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची स्थापना उदयोन्मुख आणि गुणी क्रिकेटपटूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी केली आहे. आमच्या सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांमुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्यास ही अकॅडमी निश्चितच मदत करेल.”