अनिल धनवटे
शिवाजीनगर, २२ डिसेंबर २०२५: पुणे पुस्तक महोत्सवानंतर आता भिमथडी जत्रेने पुणेकरांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. शहरात सध्या या जत्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत असून ग्रामीण संस्कृती, शेती आणि स्वदेशी उत्पादनांचा उत्सव अनुभवण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भिमथडी जत्रा, हे केवळ प्रदर्शन नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जिवंत आरसा मानला जात आहे. या जत्रेमध्ये शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि उद्योजकांना थेट ग्राहकांशी जोडणारी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जत्रेमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, सेंद्रिय उत्पादने, हस्तकला, पारंपरिक कपडे, शेतीपूरक व्यवसायांची उत्पादने मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली आहेत. “आमच्या उत्पादनांना थेट ग्राहक मिळतात, मधला दलाल नाही, त्यामुळे योग्य दर मिळतो,” असे अनेक महिला बचत गटातील महिला म्हणाल्या.
दरम्यान काल रविवारचा हा सुट्टीचा दिवस असल्याने लहान मुलांपासून ते वृद्ध वयोगटातील सर्वांनी जत्रेला हजेरी लावली होती. जत्रेत आलेल्या उमेश दोरकर यांनी सांगितले की, “या ठिकाणी असलेले बारा बलुतेदार आणि त्यांची कामे दाखवण्यात आली आहेत. ते बघून अनेकांना त्याचे नवलं वाटते. अशाही परंपरा आपल्या भारतात आहेत हे नागरिकांना माहित नव्हते. या भिमथडी जत्रेमुळे लोकांना आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दल माहिती मिळते”.
पुणेकरांसाठी ही जत्रा खरेदीसोबतच ग्रामीण जीवनशैली, लोककला, आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती अनुभवण्याची संधी देत आहे. त्यामुळे भिमथडी जत्रा ही केवळ बाजारपेठ न राहता शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातील नाते अधिक घट्ट करणारे सांस्कृतिक उत्सव ठरत आहे.

More Stories
Pune: महापालिका निवडणूक ची रणधुमाळी 23 डिसेंबर पासून सुरू
निवडणुकीआधी भाजपचा मेगा स्ट्राईक! पुणे–पिंपरीत २२ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादी–उबाठा–काँग्रेसला मोठा धक्का
‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ – मुरलीधर मोहोळ