पुणे, ०४/०५/२०२३: विमाननगर भागात मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मसाज सेंटर व्यवस्थापक मणीकंठ राहुल नायडू (वय २०, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड), विशाल अग्रवाल, नायडू बाई, नितीन माने यांच्या विरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मणीकंठ नायडूला पोलिसांनी अटक केली असून पोलीस नाईक इम्रान नदाफ यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमाननगर भागात अमायरा स्पा नावाच्या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. मसाज पार्लरवर छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरमधून रोकड तसेच मोबाइल संच असा एक लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, बाबा कर्पे, अजय राणे, इम्रान नदाफ, इरफान पठाण, रेश्मा कंक, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार