पुणे, ०४/०५/२०२३: वेगवेगळ्या दुकानांना लागणाऱ्या सीसीटीव्हीसाठीच्या साहित्याची ऑर्डर घेऊन त्याप्रमाणे त्यांना पुरवठा करून त्या ऑर्डरच्या बदल्यात संबंधित दुकानदारांकडून घेतलेले साडेसात लाख रुपये दुकानाच्या बँक खात्यावर न जमा करता, सदर पैशांचा कर्मचाऱ्यांनी अपहार करून साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक प्रभात नावजिया (वय -36, राहणार -पुणे) यांनी आरोपी अमर इस्माईल शेख (वय – ३६, राहणार -कासरवाडी ,पुणे )याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.सदरचा प्रकार 26 /11 /2019 ते 26 /2 /2022 यादरम्यान घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर शेख याने तक्रारदार कार्तिक नवजीया यांच्या भवानी पेठेतील ब्ल्यू पॉईंट पावर लाईन्स या दुकानातून स्टार डिस्ट्रीब्युटर्स बारामती, रतन राज कॉम्प्युटर घोरपडी पेठ पुणे, आणि सिलिकॉन सिस्टीम सदाशिव पेठ, युनिक एंटरप्राइजेस हांडेवाडी यांच्या नावावर वेळोवेळी सात लाख ५० हजार रुपये किमतीच्या सीसीटीव्हीसाठी लागणाऱ्या साहित्याची ऑर्डर घेतली.
त्याप्रमाणे त्यांना मालाचा पुरवठा करून त्या ऑर्डरच्या बदल्यात संबंधित दुकानदारांकडून साडेसात लाख रुपये घेऊन ते तक्रारदार यांच्या दुकानाच्या बँक खात्यावर न भरता, संबंधित रकमेचा आरोपीने अपहार केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस पुढील तपास करत आहे.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार