पुणे, 17 मे 2023 : मोहनवीणा आणि सात्विकवीणा यांचा बहारदार अविष्कार पुणेकर रसिकांनी अनुभविला निमित्त होते सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल या संस्थेच्या वतीने तबला सम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रध्दा सुमन’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मोहनवीणा आणि सात्विक वीणेच्या झंकाराने पुणेकरांना जणू विस्मयीत केले. यावेळी ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण पं विश्वमोहन भट्ट आणि त्यांचे सुपुत्र तंत्री सम्राट पं सलील भट्ट यांनी आपले वीणावादन प्रस्तुत केले. त्यांनी राग गावती सादर केला. यावेळी या दोघांनी जुगलबंदी सादर करीत दुर्मिळ लयकारीचे प्रदर्शन करीत राग खुलवत नेला. यासोबतच ग्रॅमी पुरस्कार प्राप्त ‘अ मिटींग बाय दी रिव्हर…’ ही रचना सादर केली. त्यांना पं हिमांशू महंत यांनी समर्पक तबलासाथ केली. यानिमित्ताने पुणेकरांनी मोहनवीणा आणि सात्विक वीणा यांचे वादन अनुभविले.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: धनकवडी, औंध क्षेत्रात जोरदार अतिक्रमण कारवाई
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?