पुणे, 21 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सहाव्या फेरीत पीएसपीबीच्या सेतुरामन एसपी याने 6 गुणांसह एकट्याने आघाडीचे स्थान मिळवले. तर, कर्नाटकच्या अपूर्ण कांबळेने ग्रँडमास्टर सायांतन दास विरुध्द विजय मिळवताना सनसनाटी विजयाची नोंद केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सहाव्या फेरीत सेतुरामनने काळी मोहरी घेऊन खेळताना अत्यंत तंत्रशुद्ध लढतीच्या अखेरीस दीप सेनगुप्ताला कोंडीत पकडून महत्वपूर्ण विजयाची नोंद केली. तर, अपुर्व कांबळेने पांढरी मोहरी घेऊन खेळताना सायंतन दासने केलेल्या चुकीचा अचूक फायदा घेत स्पर्धेतील धक्का दायक विजयाची नोंद केली.
पहिल्या पटावर खेळताना पश्चिम बंगालच्या ग्रँड मास्टर मित्रभा गुहाने पाचव्या फेरी पर्यंत आघाडीवर असलेल्या अभिमन्यू पुराणिकला बरोबरीत रोखले. काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्या गुहाने केलेल्या या कामगिरी मुळे अभिमन्यूची विजयाची मालिका रोखली गेली.
चौथ्या पटावर खेळताना पश्चिम बंगालच्या दिप्तयन घोषला पीएसपीबीच्या व्यंकटेश एमआर विरुध्द बरोबरी साधता आली. पांढरी मोहरी घेऊन खेळणाऱ्या व्यंकटेशची स्थिती अखेरपर्यंत सरस होती. परंतु काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्या घोषने उत्कृष्ठ बचाव करताना पराभव टाळण्यात यश मिळवले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सहावी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
अभिमन्यू पुराणिक(5.5गुण)(एएआय)बरोबरी वि.मित्रभा गुहा(5.5गुण)(पश्चिम बंगाल);
दीप सेनगुप्ता(5 गुण)(पीएसपीबी) पराभुत वि सेतुरामन एसपी(6गुण)(पीएसपीबी);
सूर्य शेखर गांगुली(5गुण)(पीएसपीबी)बरोबरी वि.दीपन, चक्रवर्ती जे.(5गुण)(आरएसपीबी);
व्यंकटेश एमआर(5गुण)(पीएसपीबी)बरोबरी वि. दिप्तयन घोष(5गुण)(पश्चिम बंगाल);
विष्णू, प्रसन्न. व्ही(4.5गुण)(तामिळनाडू)पराभुत वि.आरोन्यक घोष(5.5गुण)(आरएसपीबी);
कोल्ला, भवन(5गुण)(आंध्रप्रदेश)बरोबरी वि . श्यामनिखिल पी(5गुण)(आरएसपीबी);
उत्कल साहू(4गुण)(ओडिशा)पराभुत वि.अभि जीत गुप्ता(5गुण)(पीएसपीबी);
विशाख एनआर(5गुण)(आरएसपीबी)वि.वि.दिने श शर्मा(4गुण)(एलआयसी);
प्रवीण कुमार सी(4गुण)(तामिळनाडू)पराभुत वि. इनियन पी(5गुण)(तामिळनाडू);
अपूर्व कांबळे(5गुण)(कर्नाटक)वि.वि. सायंतन दास(4गुण)(आरएसपीबी);
ग्रँडमास्टर आकाश जी(4.5गुण)(तामिळनाडू)बरोबरी वि .कैवल्य नागरे(4.5गुण)(महा);
नीलाश साहा(5गुण)(आरएसपीबी)वि.वि.विवा न शहा(4गुण)(गुजरात);
अनुज श्रीवात्री(5गुण)(मध्यप्रदेश)वि .वि.यश भराडिया(4गुण)(राजस्थान);
अर्घ्यदीप दास(5गुण)(आरएसपीबी)वि.वि.आकाश जी(4गुण)(तामिळनाडू);
श्रीहरी एलआर(5गुण)(तामिळनाडू)वि.वि.पो तलुरी, सुप्रीथा(4गुण)(आंध्रप्रदेश);
हर्षित पवार(4.5गुण)(दिल्ली)बरोबरी वि. कृष्णा सीआरजी(4.5गुण)(आरएसपीबी);
श्रयन मजुमदार(4गुण)(महा)पराभुत वि.मे हर चिन्ना रेड्डी सीएच(5गुण)(आरएसपीबी).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय