September 23, 2025

पुणे स्टेशन येथे बेबी फीडिंग रूम सुविधा प्रारंभ

पुणे, २२/०८/२०२३: पुणे विभागीय प्रशासन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान आणि रेल्वे स्थानकावर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

याच अनुषंगाने पुणे स्टेशनच्या फलाट क्रमांक एकवर असलेल्या महिला वेटिंग रूममध्ये शिशु स्तनपान कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, वेटिंग रूममध्ये स्वतंत्रपणे उभारण्यात आलेल्या या खोलीत खुर्ची, टेबल, पंखा, लाईट यासह इतर सुविधा उपलब्ध असून या खोलीस आतून व बाहेरून बंद करता येते जेणे करून अधिक सुरक्षितता आहे.

“चाइल्ड हेल्प फाऊंडेशन” या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने खोलीची सुविधा उभारण्यात आल्याने स्थानकावर गाडीची वाट पाहणाऱ्या महिलांना आपल्या मुलांना जेवण देताना सुरक्षित आणि आरामदायी वाटेल.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे स्टेशन चे स्टेशन डायरेक्टर श्री मदनलाल मीणा यांचे संयोजनात रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांना मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या अशा उपक्रमातून अग्रेसर आहे.