September 23, 2025

60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत पुराणिक विरुद्धच्या सेतुरामन एसपीची आघाडी कायम

पुणे, 22 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सातव्या फेरीअखेर पीएसपीबीच्या सेतुरामन एसपी याने दुसऱ्या मानांकित अभिमन्यू पुराणिक विरुद्धच्या संघर्षपूर्ण लढतीत बरोबरी साधताना आघाडीचे स्थान कायम राखले. 
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत अत्यंत चुरशीच्या लढतीत सेतुरामन व पुराणिक यांनी अत्यंत सावध खेळ केला आणि कोणताही धोका न पत्करता बरोबरीवर समा धान मानले. यामुळे सेतुरामन एसपी आता 6.5 गुणांसह आघडिवर आहे. 
 
स्पर्धेची सातवी फेरी अनेक डावांमधील बरोबरीने साधली. पहिल्या दहा पटावरील पाच सामने तर पहिल्या पाच मधील आश्चर्यकारक तीन सामने बरोबरीत सुटले. दुसऱ्या पटावर खेळणाऱ्या ग्रँड मास्टर मित्रभा गुहाने सनसनाटी फॉर्म मध्ये असलेल्या आंतर राष्ट्रीय मास्टर अरोण्यक घोष विरुध्द केवळ 30मिनिटात वरोबरी साधली. एका चालीची तीनदा पुनरावृत्ती झाल्यामुळे हा डाव बरोबरीत सुटल्याचे पंचांनी सांगीतले. 
 
अव्वल मानांकित अभिजीत गुप्ताला तिसऱ्या पटावर आंतरराष्ट्रीय मास्टर नीलाश सहा विरुध्द धक्का दायक पराभव पत्करावा लागला. काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्या नीलाशने गुप्तच्या चुकीचा फायदा घेत महत्वपूर्ण विजय नोंदवला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सातवी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:   
सेतुरामन एसपी(6.5गुण)(पीएसपीबी)बरोबरी वि.अभिमन्यू पुराणिक(6गुण)(एएआय);
मित्रभा गुहा (6गुण)(पश्चिम बंगाल)बरोबरी वि.अरण्यक घोष (6गुण)(आरएसपीबी);
अभिजीत गुप्ता(5गुण)(पीएसपीबी)पराभुत वि.नीलाश सहा(6गुण)(आरएसपीबी);
अनुज श्रीवात्री(5.5गुण)(मध्यप्रदेश)बरोबरी वि.सूर्य शेखर गांगुली(5.5गुण)(पीएसपीबी);
सिद्धांत महापात्रा(5गुण)(आरएसपीबी)पराभुत वि.विशाख एनआर(6गुण)(आरएसपीबी);
इनियान पी(6गुण)(तामिळनाडू)वि.वि.वेंकटेश एमआर(5गुण)(पीएसपीबी);
भूपनाथ (5गुण)(बिहार)पराभुत वि.दीप सेनगुप्ता(6गुण)(पीएसपीबी);
श्यामनिखिल पी(5.5गुण)(आरएसपीबी)बरोबरी वि.श्रीहरी एलआर(5.5गुण)(तामिळनाडू);
दीपन चक्रवर्ती जे.(5.5गुण)(आरएसपीबी)बरोबरी .वि.अपूर्व कांबळे(5.5गुण)(कर्नाटक);
आकाश जी(5.5गुण)(तामिळनाडू)वि.वि.कोल्ला भवन(5गुण)(आंध्रप्रदेश);
जॉन वेनी अक्कराकरन(4.5गुण)(केरळ)पराभुत वि.विष्णू प्रसन्ना. व्ही(5.5गुण)(तामिळनाडू);
कृष्णा सीआरजी(5.5गुण)(आरएसपीबी)वि.वि.शारशा बेकर(4.5गुण)(केरळ);
कैवल्य नागरे(4.5गुण)(महा)पराभुत वि.सोहम कामोत्रा(5.5गुण)(जम्मू व कश्मीर);
श्रीराम झा(5.5गुण)(एलआयसी)वि.वि.अंबरीश शर्मा (4.5गुण)(पश्चिम बंगाल);
विघ्नेश वेमुला(5.5गुण)(तेलंगणा)वि.वि.सुयोग वाघ(4.5गुण)(महा);
राजेश नायक (5.5गुण)(ओडिशा)वि.वि.हर्षित पवार (4.5गुण)(दिल्ली);
वेदांत गर्ग(5.5गुण)(चंदीगढ)वि.वि.श्रेयांस शाह(4.5गुण)(महा);