पुणे, ०८/०९/२०२३: हडपसर भागातील रामटेकडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
शुभम उर्फ चम्या संजय कांबळे (सध्या रा. कुंजीरवाडी, सोलापूर रस्ता, मूळ रा. रामटेकडी, हडपसर), टिल्ली उर्फ इरफान गुलाम मोहम्मद शेख (वय १९), मंगेश रवी जाधव (वय २०, दोघे रा. रामटेकडी, हडपसर), फिटर प्रेम्या उर्फ प्रेम अनिल थोरात (वय १९, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर ) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. कांबळे, शेख, जाधव, थोरात यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी रामटेकडी भागात एका दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कांबळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विनय पाटणकर,उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी आरोपी कांबळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील ५७ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
More Stories
रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम माने पाटील, पूर्वा मुंडळे, अगस्त्य तितार, निरंजन मंत्री यांची विजयी आगेकूच कायम
जुन्नरमध्ये आशासेविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; ३६५ आशासेविकांची तपासणी
गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे -पोलीस आयुक्त अमितेश कुमार