पुणे, दि. ११/०९/२०२३: मित्र-मैत्रिणीसोबत पाषाण टेकडीवर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरूणीला धमकावून चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. ही घटना १० सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तरूणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरूणी आणि तिचे मित्र रविवारी दुपारी पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तरूणीसह तिच्या बरोबर असलेल्या मित्र-मैत्रिणीला धमकावले. तिच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले. दरम्यान, यापुर्वीळी पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांना चोरट्यांनी लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार