September 23, 2025

दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत संघवी शूटर्स संघाची विजयी सलामी

पुणे, 13 सप्टेंबर, 2023: पुना क्लब लिमिटेड आयोजित दुसऱ्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत गटसाखळी फेरीत संघवी शूटर्स संघाने विजयी सलामी दिली.

पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात अंगद सहानी, आरके शर्मा, कुणाल वासवानी, मिनू करकरीया, रोहींगटन इराणी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मनिषा रॉयल्स संघाने जॅगवॉर्स संघाचा 4-1 असा पराभव करून आगेकूच केली.

दुसऱ्या लढतीत ब गटात संघवी शुटर्स संघाने द व्हर्लविंड्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून धीरज कोचर, गिरीश दामले, अश्रफ परवानी, गिरीश दामले, शाहबेहराम रब्बानी, संजय संघवी, धीरज कोचर यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
अ गट: मनीषा रॉयल्स वि.वि.जॅगवॉर्स 4-1(15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: अंगद सहानी वि.वि.आशिष मेहता 68-41; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: मिनू करकरिया/रोहींगटन इराणी पराभुत वि.तुषार आसवानी/राजेश जंदियाल 64-97; हॅंडीकॅप बिलियर्ड्स 200पॉईंट्स: आरके शर्मा वि.वि.शाम राठी 200-162; 6 रेड हॅंडिकॅप स्नूकर: कुणाल वासवानी वि.वि.संजय दिडी 52-20, 55-64, 45-31; ब्लू शॉट: अंगद सहानी/कुणाल वासवानी/मिनू करकरीया/रोहींगटन इराणी/आरके शर्मा वि.वि.आशिष मेहता/राजेश जंदियाल/संजय दिडी/तुषार आसवानी/शाम राठी 5-2);

ब गट: संघवी शुटर्स वि.वि.द व्हर्लविंड्स 3-2 (15 रेड हॅंडिकॅप स्नूकर: संजय संघवी पराभुत वि.विघ्नेश संघवी 51-92; 15 रेड हॅंडिकॅप स्नूकर दुहेरी: शाहबेहराम रब्बानी/अश्रफ परवानी पराभुत वि.सुनील आशेर/कपिल सामंत 61-84; हॅंडीकॅप बिलियर्डस २०० पॉईंट्स: धीरज कोचर वि.वि.साहिल हांडा 200-178; 6 रेड हॅंडिकॅप स्नूकर: गिरीश दामले वि.वि.कार्तिक नागराणी 64-40, 65-47; ब्लू शॉट: अश्रफ परवानी/गिरीश दामले/शाहबेहराम रब्बानी/संजय संघवी/धीरज कोचर वि.वि.कपिल सामंत/सुनील आशेर/रुसी मरोलिया/विघ्नेश संघवी/साहिल हांडा 3-2).