पुणे, दि. २१/०९/२०२३: जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एकाला गाठून बेदम मारहाण केली. त्यानंतर हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केल्याची घटना १३ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास शिवदर्शन परिसरात घडली आहे.
अमित देवेंद्र, उमेश कडू, गणेश देवेंद्र, यांच्यासह चार ते पाच जणांविरूद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश देवेंद्र (वय २५ रा. शिवदर्शन, पर्वती ) याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीतील असून त्यांची काही महिन्यांपुर्वी भांडणे झाली होती. त्याच रागातून आरोपी अमितने इतर साथीदारांना बोलावून घेत राजेशला बेदम मारहाण केली. एका आरोपीने त्याच्याकडील कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली आहे.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन