September 23, 2025

पुणे: हळदी कुुंकवासाठी चाललेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे, दि. २४/०९/२०२३: गौरायानिमित्त मैत्रिणीच्या घरी हळदी-कुंकवासाठी पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २३ सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हिंगणे खुर्द परिसरातील पोस्ट ऑफीस गल्लीकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली.

मालती घोलप (वय ५८, रा. हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालती आणि त्यांच्या सहकारी २३ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास हिंगणे खुर्द परिसरातून मैत्रिणीच्या घरी हळदी-कुंकवासाठी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलांनी आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहेत.