पुणे, २५/०९/२०२३: लष्कर भागातील एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला धमकावून एक हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
निलेश दशरथ कणसे (वय ३९, रा. जान महंमद स्ट्रीट, लष्कर), अविनाश राजेंद्र पंडीत (वय ३२, रा. शिंपी आळी, महात्मा गांधी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश पाटणे (वय ३७, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाटणे यांचा लष्कर भागात चहा विक्रीचे दुकान आहे. कणसे, पंडीत वर्गणीसाठी दुकानात आले होते. पाटणे यांनी त्यांना १५१ रुपये दिले. त्यानंतर कणसे आणि पंडीत यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपये मागितले.
पाटणे यांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्यांना मारहाण केली. पाटणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर कणसे आणि पंडीत यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन