September 24, 2025

ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हृतिक कटकम, आयुश पुजारी, व्रंदिका राजपूत , पार्थसारथी मुंढे यांचा अंतिम फेरीत प्रवेश

औंरंगाबाद, दि.2 नोव्हेंबर 2023: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात हृतिक कटकम, आयुश पुजारी यांनी, तर मुलींच्या गटात व्रंदिका राजपूत, पार्थसारथी मुंढे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

एन्ड्युरंस टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हृतिक कटकमने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत 
फजल अली मीरचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित आयुश पुजारी याने चौथ्या मानांकित निवेद पोनपा कोनेराचा 6-3, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित पार्थसारथी मुंढेने दिया अग्रवाचा 
6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.  दुसऱ्या मानांकित औरंगाबादच्या वृंदिका राजपूत हिने रिद्धी शिंदेचा 4-6, 6-2, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे व  अव्यक्त रायवरपू या जोडीने अव्वल मानांकित मधुमिता  रमेश व  दक्षिणश्री एसआर यांचा  6-1, 6-2 असा तर, दिया अग्रवाल व  व्रंदिका  राजपूत यांनी त्वेशा नंदनकर व रिया गंगाम्मा पुडियोक्काडा यांचा 7-5, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 
निकाल: एकेरी: मुले: उपांत्य फेरी: मुख्य ड्रॉ:
हृतिक कटकम(भारत)[1]वि.वि.फजल अली मीर (भारत) 6-3, 6-3;
आयुश पुजारी(भारत)[2]वि.वि.निवेद पोनपा कोनेरा (भारत) [4]  6-3, 6-3;

मुली:
पार्थसारथी मुंढे (भारत)[1]वि.वि.दिया अग्रवाल (भारत) 6-2, 6-1;
व्रंदिका राजपूत(भारत)[2]वि.वि.रिद्धी शिंदे (भारत) 4-6, 6-2, 6-1.

दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
वरद पोळ (भारत)/आयुश पुजारी(भारत)[1]वि.वि.इशान खडीर (भारत)/देवेंद्र कुलकर्णी (भारत) 6-1, 6-1;
आदित्य आचार्य(भारत)/ क्रिशांक जोशी(भारत)वि.वि.सिद्धेश खाडे(भारत)/ कृष्णा राणी(भारत)6-2,6-0;
फजल अली मीर (भारत)/ प्रकाश सरन(भारत)वि.वि.यशराज जरवाल(भारत)/ मलय केयूरभाई मिंजरोला (भारत) 6-1, 6-2;

मुली:
पार्थसारथी मुंढे(भारत) / अव्यक्त रायवरपू (अमेरिका)वि.वि.मधुमिता रमेश (भारत) / दक्षिणश्री एसआर(भारत)[1] 6-1, 6-2;
मेहा पाटील (भारत)/ रिद्धी शिंदे(भारत)वि.वि.काव्या देशमुख (भारत) / आर्या शिंदे (भारत) 6-1, 6-7(1), 10-8
ईश्वरी मार्कंडे (भारत)/संयुक्ता पगारे (भारत)वि.वि.पृथा राव (भारत)  कृतिका रेड्डी वंगाला (भारत)6-1, 4-6, 10-2;
दिया अग्रवाल (भारत) /  व्रंदिका  राजपूत (भारत)वि.वि. त्वेशा नंदनकर (भारत)/रिया गंगाम्मा पुडियोक्काडा (भारत)7-5, 7-5.