पुणे, दि. २३ नोव्हेंबर, २०२३ : पुण्यातील पी. एम. शहा फाऊंडेशन व वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुत्क विद्यमाने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक आणि समाजसेवक अनिकेत प्रकाश आमटे यांच्या मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार दि २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल समोरील वर्धमान प्रतिष्ठान या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल अशी माहिती पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक अॅड चेतन गांधी यांनी कळविली आहे.
लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु असलेला दवाखाना, सामुदायिक आरोग्य कार्यक्रम, शाळा, साधना विद्यालय, जिंजगाव येथील लोक बिरादरी शिक्षासंकुल, अतिरिक्त कार्य, प्राणी अनाथालय, ग्रामविकास योजना अशा अनेक उपक्रमांबद्दल अनिकेत आमटे आपले विचार व्यक्त करणार आहेत.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन