पुणे,दि.23 नोव्हेंबर 2023: एम टेनिस अकादमी व शेपींग चॅम्पियन्स यांच्या संलग्नतेने आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज (14 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत मुलांच्या गटात स्मित उंडरे, अथर्व येलभर यांनी, तर मुलींच्या गटात श्रावी देवरे, जान्हवी चौगुले यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकूल टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंडरेने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथ्या मानांकित स्वर्णिम येवलेकरचा 6-4, 6-3 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या अथर्व येलभर याने आठव्या मानांकित आर्यन किर्तनेचा 6-4, 6-2 असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम राखली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित काव्या देशमुखचा 6-3, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. बिगरमानांकीत जान्हवी चौगुलेने चौथ्या मानांकित रित्सा कोंडकर 3-6, 6-4, 6-0 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत मुलांच्या गटात स्वर्णिम येवलेकर व नमिश हुड या अव्वल मानांकित जोडीने तिसऱ्या मानांकित आश्रित मज्जी व आरुष पोतदार यांचा 6-0, 6-3 असा तर, समिहन देशमुखने सनत कडलेच्या साथीत वैष्णव रानवडे व शौनक शहा यांचा 6-2, 6-2 असा पराभव केला.
मुलींच्या गटात काव्या देशमुख व श्रेया होनकन यांनी अनुष्का जोगळेकर व अवनी देसाई यांचा 6-0, 7-5 असा तर, सारा फेंगसे व प्रार्थना खेडकर यांनी जान्हवी चौगुले व मायरा टोपनो यांचा 6-1, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: मुले:
स्मित उंडरे(1)वि.वि.स्वर्णिम येवलेकर(4)6-4, 6-3;
अथर्व येलभर वि.वि.आर्यन किर्तने(8) 6-4, 6-2;
मुली:
श्रावी देवरे(1)वि.वि.काव्या देशमुख(3)6-3, 7-5;
जान्हवी चौगुले वि.वि.रित्सा कोंडकर(4)3-6, 6-4, 6-0;
दुहेरी: मुले:
स्वर्णिम येवलेकर/नमिश हुड (1) वि.वि.आश्रित मज्जी/आरुष पोतदार(3) 6-0, 6-3;
समिहन देशमुख/सनत कडले(2)वि.वि.वैष्णव रानवडे/शौनक शहा(4) 6-2, 6-2;
मुली:
काव्या देशमुख/श्रेया होनकन(1)वि.वि.अनुष्का जोगळेकर/अवनी देसाई 6-0, 7-5;
सारा फेंगसे/प्रार्थना खेडकर (3)वि.वि.जान्हवी चौगुले/मायरा टोपनो(2) 6-1, 6-1.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय