मुंबई, 24 नोव्हेंबर 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत रामकुमार रामनाथन, सिद्धार्थ विश्वकर्मा या भारतीय खेळाडूंनी विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या तिसऱ्या मानांकित रामकुमार रामनाथन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित जपानच्या रियुकी मात्सुदाचा टायब्रेकमध्ये 7-6(6), 3-6, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अमेरिकेच्या हॅरिसन अॅडम्स याने अव्वल मानांकित रशियाच्या एव्हेग्नी डोन्स्कॉयचा 6-3, 7-6(4) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित लुई वेसेल्स याने भारताच्या सातव्या मानांकित एस डी प्रज्वल देवचे आव्हान 6-4, 6-3 असे मोडीत काढले. भारताच्या सिद्धार्थ विश्वकर्मा याने सहाव्या मानांकित सिद्धार्थ रावतचा 6-3, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालासह उपांत्य फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्य फेरीत पुरव राजा व रामकुमार रामनाथन या अव्वल मानांकित भारतीय जोडीने जपानच्या रियुकी मात्सुदा व र्योतारो तागुची यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
लुई वेसेल्स (जर्मनी)[2]वि.वि. एस डी प्रज्वल देव (भारत)[7] 6-4, 6-3;
सिद्धार्थ विश्वकर्मा(भारत)वि.वि.सिद्धार्थ रावत(भारत)[6] 6-3, 6-3;
रामकुमार रामनाथन (भारत)[3]वि.वि.रियुकी मात्सुदा(जपान)[5]7-6(6), 3-6, 7-5;
हॅरिसन अॅडम्स (अमेरिका)वि.वि.एव्हेग्नी डोन्स्कॉय(रशिया)[1] 6-3, 7-6(4);
दुहेरी: उपांत्य फेरी:
हॅरिसन अॅडम्स (अमेरिका)/व्लादिस्लाव ऑर्लोव्ह(युक्रेन) वि.वि.एसडी प्रज्वल देव(भारत)/ [2] / नितीन कुमार सिन्हा (भारत) 7-5, 7-5;
पुरव राजा(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत)[1] वि.वि.रियुकी मात्सुदा(जपान)/र्योतारो तागुची(जपान) 6-3, 6-4;
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय