September 24, 2025

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडे, अर्णव बनसोडे, मनन अगरवाल यांचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे,दि.2 डिसेंबर 2023: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडे, अर्णव बनसोडे, मनन अगरवाल यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत सार्थ बनसोडे याने सातव्या मानांकित देवर्षी सेनचा 3-6, 6-3, 10-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. भारताच्या अर्णव बनसोडेने ऑस्ट्रियाच्या आठव्या मानांकित आर्यन घाडगेचा 6-3, 4-6, 10-7 असा पराभव दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला. मनन अग्रवाल याने बाराव्या मानांकित लेथाईश कोंबिलाचा 6-2, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली.

ओम पटेलने हृतिक कटकमला 6-4, 2-6, 12-10;l असे पराभुत केले. आयुश पुजारी याने आदित्यराज अय्यंगारचे आव्हान 6-1, 6-3 असे संपुष्टात आणले. शिवतेज शिरफुलेने स्वराज ढमढेरेवर 3-6, 6-4, 10-3 असा विजय मिळवला.

निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
ओम पटेल (भारत) वि.वि.हृतिक कटकम (भारत) 6-4, 2-6, 12-10;
आयुश पुजारी (भारत)वि.वि.आदित्यराज अय्यंगार (भारत) 6-1, 6-3;
सार्थ बनसोडे (भारत)वि.वि.देवर्षी सेन (भारत)[7]3-6, 6-3, 10-4;
ओंकार शिंदे (भारत)वि.वि.अचिंत्य वर्मा (भारत) 6-4, 6-2;
शिवतेज शिरफुले (भारत)वि.वि.स्वराज ढमढेरे (भारत) 3-6, 6-4, 10-3;
विश्वजीत सणस (भारत)[10]वि.वि.अर्जुन किर्तने(भारत) 6-1, 6-4;
श्रीकर डोनी (भारत)वि.वि.नील जोगळेकर (भारत) 6-3, 6-3;
नीव कोठारी (भारत)वि.वि.पियुश जाधव (भारत) 6-2, 6-1;
पार्थ देवरुखकर (भारत) [9]वि.वि.कौशिक कुमार (भारत) 6-2, 6-1;
सूर्या काकडे (भारत)वि.वि.आदित्य गायकवाड (भारत) 6-4, 6-3;
अनमोल नागपुरे(भारत)वि.वि.त्रिशांत रेड्डी दांडू (भारत) 6-1, 5-7, 10-8;
अर्णव बनसोडे (भारत)वि.वि.आर्यन घाडगे(ऑस्ट्रिया) [8]6-3, 4-6, 10-7;
प्रणव कोरडे (भारत)[5]वि.वि.अनिमेश जगदाळे (भारत) 7-5, 6-3;
अर्चित धूत (भारत)वि.वि.फतेह्याब सिंग (भारत) 6-4, 6-1;
चन्नमल्लिकार्जुन येल (भारत)वि.वि.सार्थक गायकवाड(भारत) 6-2, 6-2;
अथर्व शुक्ला(भारत)वि.वि.यशवंत गुणलापल्ले(भारत) [11] 6-1, 3-6, 10-7;
पार्थ सोमाणी (भारत)वि.वि.अभिनव महामुनी (भारत) 6-0, 6-0;
मन्नन अग्रवाल (भारत)वि.वि.लेथाईश कोंबिला (भारत) [12]6-2, 6-2;

मुली:
धनवी काळे (भारत)वि.वि.अनुष्का महामुनी (भारत) 6-0, 6-0;