September 24, 2025

पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेस जीएम टायफुन्स संघाची विजयी मालिका कायम

पुणे, 11 डिसेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत जीएम टायफुन्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय नोंदवला.

पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सुमेध गांगल(नाबाद 23 व 3-7) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीएम टायफुन्स संघाने रॉयल स्टॅलियन्स संघावर 32 धावांनी विजय मिळवला. मधुर इंगळहळीकर नाबाद 52 धावांच्या जोरावर टायगर्स संघाने वेअर वुल्व्हस संघावर 8 गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.

अन्य लढतीत आर्यन देसाई नाबाद 54 धावांच्या खेळीच्या जोरावर नॉक99 पुणेरी बाप्पा संघाने साठे बोथरा जॅगवॉर्स संघावर 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इशांत रेगे नाबाद 62 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लायन्स संघाने स्वोजस टायगर्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. सुधांशु मेडसीकर 56धावांच्या जोरावर सैनुमेरो चिताज संघाने ट्रुस्पेस नाइट्सचा 37 धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला.

निकाल: साखळी फेरी:
जीएम टायफून्स: 6 षटकात 2बाद 83धावा (क्रिश शहा 27(15,2×4,2×6), अश्विन शाह 25(12,2×4,2×6), सुमेध गांगल नाबाद 23(8,1×4) ,2×6), नील जैन 2-9) वि.वि.रॉयल स्टॅलियन्स: 6 षटकात 4 बाद 51धावा(नंदन डोंगरे नाबाद 15, सुमेध गांगल 3-7, अश्विन लोणकर 1-5); सामनावीर – सुमेध गांगल; जीएम टायफून्स संघ 32 धावांनी विजयी;

वेअर वुल्व्हस: 6 षटकात 7बाद 59धावा(पियूश शर्मा 18, अनुज लोहाडे 10, अभिषेक ताम्हाणे 2-7, पार्थ ओझा 2-15, रोहित मेहेंदळे 1-5) पराभुत वि.टायगर्स: 4.4 षटकात बिनबाद 62(मधुर इंगळहळीकर नाबाद 52(21,4×4,4×6), देवेंद्र चितळे नाबाद 8)); सामनावीर – मधुर इंगळहळीकर; टायगर्स संघ 8 गडी राखून विजयी

चिताज: 6 षटकात 2बाद 88धावा(विमल हंसराज नाबाद 38(21,2×4,2×6), गौतम मालकर्णेकर 21(8,3×6), अनवीर नन्ना नाबाद 12, मोनीश गोखले 1-11, जयकांत वैद्य 1-21) वि.वि.लायन्स: 6 षटकात 1बाद 87धावा (इशांत रेगे नाबाद 69(25,3×4,7×6), मोनिष गोखले नाबाद 11, मिलिंद शालगर 1-6); सामनावीर – इशांत रेगे; चिराज संघ 1 धावेने विजयी;

—————–+++—-+++++———-+++—-_-

चिताज: 6 षटकात 3बाद 106धावा(सुधांशु मेडसीकर 56(21,3×4,6×6), गौतम मलकर्णेकर 28(8,4×4,2×6), अनवीर नन्ना नाबाद 14, निरन भुरट 1-13, कल्पक पत्की 1-16) वि.वि. नाइट्स: 6 षटकात 2बाद 69धावा(शार्दुल वालिंबे 22(12,1×4,2×6), रोहित अग्रवाल 22(13,2×4,1×6), रवी कासट नाबाद 20, अनवीर नन्ना 1-8); सामनावीर – सुधांशू मेडसीकर; चिताज संघ 37 धावांनी विजयी;

डॉल्फिन्स: 6 षटकात 2बाद 80धावा(आनंद परचुरे नाबाद 37 (16,4×4,2×6), अमित कुलकर्णी नाबाद 39 (18,3×4,2×6), देव शेवाळे 2-7)वि.वि. युनिकॉर्न: 6 षटकात 1बाद 74धावा(सिद्धार्थ बदामीकर 24(13,3×6), रोहित बर्वे नाबाद 25(10,3×6), परितोष शेट्टी नाबाद 20, शिवकुमार जावडेकर 1-2); सामनावीर – आनंद परचुरे; डॉल्फिन्स संघ 6 धावांनी विजयी;

टायगर्स: 6 षटकात 2बाद 84धावा(देवेंद्र चितळे नाबाद 33(13,3×4,2×6), अभिषेक ताम्हाणे 36(20,6×4,1×6), मोनिष गोखले 1-7) पराभुत वि.लायन्स: 5 षटकात बिनबाद 87धावा(इशांत रेगे नाबाद 62(20,3×4,6×6), हर्षा जैन नाबाद 19(11,1×4,1×6));सामनावीर- इशांत रेगे; लायन्स संघ 8 गडी राखून विजय;