September 24, 2025

अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाचा तिसरा विजय

पुणे, दि. 14 डिसेंबर 2023 – डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाने तिसरा विजय मिळवला.

डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात चुरशीच्या लढतीत सोमेन मंडल 1, सौविक ढाली 3, शुभदीप हळदर 2, एस के अल्विरिझा 1, फिरोज सरदार 2 यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाने सेंट्रल रेल्वेचा 9-8 असा पराभव केला. पराभुत संघाकडून महेश कुठे 3 उदय उत्तेकर 3, सिद्धार्थ जेएस 1,देवेंद्र जोशी 1 यांनी गोल केले. दुसऱ्या सामन्यात कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाने नेव्ही संघावर 13-12 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

अन्य लढतीत पश्चिम रेल्वे संघाने राजकोट संघावर 11-2 असा विजय मिळवला. पश्चिम रेल्वे संघाकडून श्रेयस वैद्य 3, अर्जुन कवळे 2, सारंग वैद्य 2, अक्षय कुंडे 1, करण शुक्ला 1, भूषण पाटील 2यांनी सुरेख कामगिरी बजावली.

निकाल: साखळी फेरी:
पश्चिम रेल्वे: 11(श्रेयस वैद्य 3, अर्जुन कवळे 2, सारंग वैद्य 2, अक्षय कुंडे 1, करण शुक्ला 1, भूषण पाटील 2) वि.वि.राजकोट: 2(प्रियांश दवे 1, निनाद पटेल 1);

कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए): 9(सोमेन मंडल 1, सौविक ढाली 3, शुभदीप हळदर 2, एस के अल्विरिझा 1, फिरोज सरदार 2)वि.वि. सेंट्रल रेल्वे: 8(महेश कुठे 3 उदय उत्तेकर 3, सिद्धार्थ जेएस 1,देवेंद्र जोशी 1);

नेव्ही: 10(अनंतू जीएस 2, प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 1, भागेश कुठे 1, मिधुन एजे 1,अमल एमबी 1, अंकित प्रसाद 2) वि.वि.डेक्कन जिमखाना: 6(स्वयम परदेशी 1, ऋतुराज बिडकर 1, मनीष खोमणे 1, अर्जुन देशमुख 1, शुभम धायगुडे 1, पियुश सूर्यवंशी 1)

डेक्कन जिमखाना: 15(अभिजीत मोकाशी 2, स्वयम परदेशी 1, ऋतुराज बिडकर 2, मनीष खोमणे 2, गौरव महाजनी 2, शुभम धायगुडे 1, पियुश सूर्यवंशी 5) वि.वि.सेंट्रल रेल्वे: 4(रोहित बीएस 3, सिद्धार्थ जेएस 1);

अमरावती: 9(पार्थ सुनील 8, मंथन शिवणीकर 1)वि.वि. मिदनापूर (पश्चिम बंगाल): 1(अरित्रा दास 1);

ईस्टर्न रेल्वेः 8(जयंत जना 1, सोविक दास 1, सोमनाथ रॉय 1, ओमप्रकाश प्रसाद 5)वि.वि.राजकोट: 4(प्रियांश दवे 1, युग प्रजापती 2, निनाद पटेल 1);

एअर फोर्स:6(नितीश यूएन 1, राज पाटील 1, लाल कृष्ण 1, सिबिन वर्गेस 1, कल्पेश मांडवी 1, वेदांत कुटे 1)वि.वि.रायगड: 3(सर्वेश माने 1, रोहित कुटे 2);

ईस्टर्न रेल्वेः 11(जयंत जना 1, चंदन सरकार 1, सतादीप बी 1, ओमप्रकाश प्रसाद 6, किशोर राउत 1, कुमारजीत दत्ता 1 वि.वि.मिदनापूर: 1(अरित्र दास 1);

कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए): 13 (आशिष सरदार 1, सौमेन मंडल 2, सौविक ढाली 3, शुभदीप हळदर 1, एसके अल्विरिझा 4, विश्वजीत दत्ता 2) वि.वि.नेव्ही: 12(अनंतू जीएस 2, सुमित प्रसाद 1, भागेश कुटे 3, मिधून एजे 2, वैभव कुटे 2, अमल एमबी 1, अंकित प्रसाद 1);

सेंट्रल रेल्वेः 8(रोहित बीएस 1, उदय उत्तेकर 3, सिद्धार्थ 2, देवेंद्र जोशी 1, निमिश निजामपूरकर 1)वि.वि.रायगड:7(दिनांशू कुटे 2, सार्थक इंद्रे 1, प्रेम पाटील 3, सुजय भोये 1);

पश्चिम रेल्वेः 9(अश्विनीकुमार 1, श्रेयस वैद्य 1, अर्जुन कावळे 2, सारंग वैद्य 2, अक्षयकुमार कुंडे 1, करण शुक्ला 1, भूषण पाटील 1) वि.वि.अमरावती:1(आदित्य थेटे 1);

कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए): 8 (सौमेन मंडल 1, सौविक ढाली 2, शुभदीप हळदर 1, एसके अल्विरिझा 1, फिरोज सरदार 3) वि.वि.खिदारपुर: 1 (माणिक मंडल 1);

एअर फोर्स: 10(नितीश यूएन 1, राज पाटील 4, सिबिन वर्गीस 1, कल्पेश मांडवी 1, प्रवीण जीके 3)वि.वि.डेक्कन जिमखाना: 9 (ऋतुराज बिडकर 2, गौरव महाजनी 3, अर्जुन देशमुख 1, पियुश सूर्यवंशी 3).