पुणे, दि. 16 डिसेंबर 2023 – डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वे व इंडियन नेव्ही या संघांनी कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) व ईस्टर्न रेल्वे या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात वेस्टर्न रेल्वे संघाने कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाचा 14-9 असा पराभव अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तिसऱ्या क्वार्टर अखेर दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला व त्यामुळे सामन्यात 8-8 अशी बरोबरी निर्माण झाली. अखेरच्या सत्रात वेस्टर्न रेल्वेच्या सारंग वैद्य याने तीन सलग गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. वेस्टर्न रेल्वे संघाने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखत सी एसए संघाविरुद्ध 14-9 असा विजय मिळवला. वेस्टर्न रेल्वे संघाकडून अश्विनीकुमार पुंडे 1, श्रेयस वैद्य 1, सारंग वैद्य 9, अक्षयकुमार कुंडे 2, भूषण पाटील 1) यांनी गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. तर, कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए)कडून सौमेन मोंडल 3, सोविक ढाली 2, शुभदीप हळदर 1, एसके अल्विरिझा 2. फिरोज सरदार 1 यांनी गोल केले.
दुसऱ्या सामन्यात इंडियन नेव्ही संघाने ईस्टर्न रेल्वे संघाचा 15-9 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत इंडियन नेव्ही संघाने सुरुवातीला जोरदार चाली रचल्या, पण ईस्टर्न रेल्वेच्या गोलरक्षक बिस्वजीतने आक्रमण परतावून लावले. पुढच्या तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये नेव्ही संघाने सुरेख खेळ करत ईस्टर्न रेल्वे संघावर 15-9 अशा फरकाने विजय मिळवला. इंडीयन नेव्ही संघाकडून अनंतू जीएस 1, प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 3, भागेश कुटे 3, मिधुन एजे २, वैभव कुटे 2, अंकित प्रसाद 2) यांनी गोल केले. ईस्टर्न रेल्वेकडून जयंता जना 1,अरित्रा दास 1, सोमनाथ रॉय 4, किशोर राऊथ 2, कुमारजीत दत्ता 1 यांनी गोल करण्यात यश आले.
निकाल: उपांत्य फेरी:
इंडियन नेव्ही: 15(अनंतू जीएस 1, प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 3, भागेश कुटे 3, मिधुन एजे २, वैभव कुटे 2, अंकित प्रसाद 2) वि.वि.ईस्टर्न रेल्वेः 9(जयंता जना 1,
अरित्रा दास 1, सोमनाथ रॉय 4, किशोर राऊथ 2, कुमारजीत दत्ता 1);
पश्चिम रेल्वेः 14 (अश्विनीकुमार पुंडे 1, श्रेयस वैद्य 1, सारंग वैद्य 9, अक्षयकुमार कुंडे 2, भूषण पाटील 1) वि.वि.कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए): 9(सौमेन मोंडल 3, सोविक ढाली 2, शुभदीप हळदर 1, एसके अल्विरिझा 2. फिरोज सरदार 1).
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय