September 24, 2025
Punekar News Marathi Logo

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबाराचे आयोजन

पुणे, दि. १८ : जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांनी २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ४ था मजला येथील सभागृहात उपस्थित राहवे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दे. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.