पुणे, 18 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत दोन्ही संघांकडून झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर बंगाल वॉरियर्स विरुध्द युपी योद्धाज यांच्यातील सामना अखेर 37-37 असा बरोबरीत सुटला. या स्पर्धेतील हा दुसरा टाय सामना ठरला. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाचा समावेश होता.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत गुण फलकात दिसत असल्याप्रमाणे दोन्ही संघांचा खेळ तुळ्यबल झाला. सुरींदर गील याने सुपर रेड च्या साहाय्याने युपी योद्धाज ला सुरेख सुरुवात करून दिल्यावर मनींदर सिंग आणि नितीन कुमार यांच्या कामगिरीमुळे बंगाल वॉरियर्स संघाने तोडीस तोड उत्तर दिले. योद्धाज संघाचा कर्णधार परदीप नरवाल ला पहिला गुण मिळवण्यासाठी तब्बल 12मिनिटे प्रतीक्षा करावी लागली.
मात्र, दोनवेळा युपी योद्धाजकेवळ चार खेळाडू मैदानात असतानाही वॉरियर्स च्या चढाई पटूना त्याचा फायदा घेता आला नाही. नितेशने मनिंदरची केलेली पकड आणि विजय मलिकने मिळवलेले बोनस गुण यामुळे योद्धाजने मध्यांतराला 18-14 अशी आघाडी घेतली. संपुर्ण पूर्वार्धात एकाही संघाला लोन चढवता आला नाही.
उत्तरार्धात खऱ्या अर्थाने लढत रंगली गुरदीपने मनिंदरची सुपर टॅकल द्वारे पकड केली. तेव्हा योद्धाज कडे 21-1 7अशी आघाडी होती. परंतु श्रीकांत जाधवने एकाच चढाईत दोन खेळाडू बाद करताना योद्धाज चे सर्व गडी बाद करून लोन चढविण्याची कामगिरी केली. तेव्हा वॉरियर्स कडे 24-23अशी आघाडी होती.
मात्र सुरींदरने सुपर रेड करताना आपला 10वा गुण नोंदवून योद्धाज संघाला पुन्हा आघाडीवर नेले. उत्कृष्ट चढायांच्या जोरावर योद्धाज संघाने पाच मिनिटे 35-30 अशी आघाडी होती.
मात्र संपूर्ण लढतीतील परंपरा कायम राखताना उत्कृष्ट आणि आक्रमणाच्या समिश्र कामगिरीमुळे वॉरियर्सने लवकरच सामन्यात पुनरागमन केले आणि 36-36 अशी बरोबरी साधली. अखेरच्या दोन्ही संघांनी एक गुण मिळवल्याने सामना 37-37 असा बरोबरीत सुटला.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय