सोलापूर, 17 डिसेंबर 2033: सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपनटेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत सोहा सादिक, हुमेरा बहारमुस, आकांक्षा नित्तूरे, श्राव्या चिलकलापुडी या भारतीय खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश केला.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या चरणात भारताच्या आठव्या मानांकित सोहा सादिकने नेपाळच्या सोळाव्या मानांकित अभिलाशा बिस्तचा 6-1, 6-1 असा तर, अव्वल मानांकित हुमेरा बहारमुसने प्रत्युशा रचापिडीचा 6-1, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत आकांक्षा नित्तूरेने आरती मुनियनचा टायब्रेकमध्ये 6-2, 6-7(4), 10-8 असा पराभव केला. चौथ्या मानांकित श्राव्या चिलकलापुडी हिने चौदाव्या मानांकित पूजा इंगळेवर 6-0, 2-6, 11-9 असा विजय मिळवला.
मुख्य ड्रॉ मधील मानांकन यादी जाहीर करण्यात आली. जागतिक क्रमवारीत 139व्या स्थानी असलेल्या रशियाच्या मारिया तिमोफिवाला अव्वल मानांकन देण्यात आले. भारताच्या ऋतुजा भोसलेला पाचवे तर वैदेही चौधरीला सहावे मानांकन देण्यात आले आहे.
निकाल: पहिली पात्रता फेरी: महिला:
होनोका कोबायाशी (जपान) [2]वि.वि.कुंडली मजगयने (भारत) [11]6-4, 6-1;
एकतेरिना काझिओनोव्हा [3] वि.वि.प्रियांशी भंडारी(भारत) [13]6-4, 6-2;
श्राव्या चिलकलापुडी (भारत) [4]वि.वि. पूजा इंगळे (भारत)[15]6-0, 2-6, 11-9;
ओलिव्हिया बर्गलर (पोलंड) [6]वि.वि. सोनल पाटील (भारत) [14]7-6(4), 6-3;
एलेना जमशिदी (डेन्मार्क)[5]वि.वि.यशस्विनी पांवर (भारत)[12]7-5, 1-6, 10-7;
सोहा सादिक(भारत)[8]वि.वि.अभिलाशा बिस्त(नेपाळ) [16] 6-1, 6-1;
हुमेरा बहारमुस (भारत) [१]वि.वि.प्रत्युशा रचापिडी (भारत)6-1, 6-3;
आकांक्षा नित्तूरे(भारत)वि.वि.आरती मुनियन(भारत)6-2, 6-7(4), 10-8.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: एकेरी गट:
1. मारिया टिमोफीवा (रशिया) 2.एकतेरिना मकारोवा (रशिया), 3.सॅफो साकेलारिडी (ग्रीस), 4.आयनो शिमिझू (जपान), 5.ऋतुजा भोसले (भारत), 6.डायना मार्सिचेविका (लात्विया), 7.सहजा यमलापल्ली(भारत), ८.वैदेही चौधरी(भारत);
दुहेरी गट: 1. डायना मार्सिचेविका/ सॅफो साकेलारिडी , 2, श्रीवल्ली रश्मिका भामिदिपती / वैदेही चौधरी 3. एकतेरिना काझिओनोवा / एकतेरिना याशिना 4., हिरोमी आबे / साकी इमामुरा
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय