पुणे, 18 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अनुभवी दबंग दिल्ली संघाचे आव्हान 30-23 असे मोडून काढताना युवा खेळाडूंचा भरणा अल्सलेया पुणेरी पलटण संघाने आपली विजयी मालिका कायम राखली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत दोन्ही संघांचे बचाव पटू एकूण तब्बल 17 गुण मिळवत असताना पुणेरी पलटच्या अस्लम इनामदारने चढाईत 8 गुण, आशू मलिकचे चढाईत 8 गुण मिळवताना आपला वेगळा ठसा उमटविला.
सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणाऱ्या पुणेरी पलटण संघाने लवकरच आघाडी मिळवली. त्याचवेळी अनुभवी नवीन कुमारची गैर हजेरी जाणवली. याचवेळी योगेशने केलेले सुपर टॅकल आणि एक अप्रतिम चाढईच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने पुणेरी पलटण वर लोन चाढवताना 13-8 अशी आघाडी मिळवली. दोन्ही संगहंचा बचाव सारख्याच दर्जाचा असताना नवीनच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीचे आक्रमण कमकुवत झालेले दिसले
पुणेरी अस्लम, मोहित गोयत यांनी प्रत्येकी सहा गुण मिळवताना मध्यांतराला पुणेरी पलटण संघाला 18-12 अशी आघाडी मिळवून दिली.
आक्रमकतेची उणीव भरून काढताना दिल्लीने उत्तरार्धात बचावावर लक्ष केंद्रित केले. त्यामूळे पुणेरी पलटण संघाला चढाईत गुण मिळेनासे झाले
अत्यंत मोक्याच्या क्षणी पुणेरी पलटणच्या चढाईपटुनी एकामगोमाग एक गुण मिळवताना मिळवलेले वर्चस्व ओकांर मोहितेच्या सुपर टॅकल मुळे कायम राहिले आणि पुणेरी पलटण संघाने विजय मिळवला.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय