सोलापूर, 21 डिसेंबर 2033: सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या वैदेही चौधरी, सहजा यमलापल्ली यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, भारताच्या ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, वैष्णवी आडकर, श्रीवल्ली भामिदिप्ती यांचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत जपानच्या हिरोमी आबे हिने रशियाच्या अव्वल मानांकित मारिया तिमोफीवाचा 2-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून खळबळजनक निकाल नोंदवला. भारताच्या सातव्या मानांकित सहज यमलापल्ली हिने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या मधुरिमा सावंतचा 6-3, 6-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. आठव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीने पोलंडच्या वेरोनिका बसझाकचा 6-2, 2-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत रशियाच्या डारिया कुडाशोवाने भारताच्या पाचव्या मानांकित ऋतुजा भोसलेचे आव्हान टायब्रेकमध्ये 4-6, 6-4, 7-6(1) असे संपुष्टात आणले.
दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाने भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीचे आव्हान 6-3, 6-4 असे मोडीत काढले. ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडी हिने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैष्णवी आडकरचा 6-3, 6-0 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. जपानच्या साकी इमामुराने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या बेल्जियमच्या विकी व्हॅन डी पीरचा 6-3, 3-6, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने लात्वियाच्या डायना मार्सिचेविका व ग्रीसच्या सॅपफो साकेल्लारिडीया अव्वल मानांकित जोडीचा 5-7, 6-4, 12-10 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. वैष्णवी आडकरने सहजा यमलापल्लीच्या साथीत श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी या दुसऱ्या मानांकित जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुख्य ड्रॉ: उप-उपांत्यपूर्व फेरी: एकेरी: महिला:
हिरोमी आबे (जपान)वि.वि. मारिया तिमोफीवा(रशिया) [1] 2-6, 6-3, 6-4;
एकतेरिना मकारोवा(रशिया)[2]वि.वि.श्रीवल्
सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस)[3]वि.वि.वैष्णवी आडकर (भारत) 6-3, 6-0;
डारिया कुडाशोवा वि.वि. ऋतुजा भोसले(भारत)[5]4-6, 6-4, 7-6(1);
डायना मार्सिचेविका(लात्विया)[6]वि.वि
सहजा यमलापल्ली (भारत)[7]वि.वि.मधुरिमा सावंत (भारत)6-3, 6-0;
वैदेही चौधरी (भारत)[8] वि.वि. वेरोनिका बसझाक (पोलंड) 6-2, 2-0;
साकी इमामुरा(जपान)वि.वि.विकी व्हॅन डी पीर(बेल्जियम)6-3, 3-6, 6-1;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
हिरोमी आबे(जपान)[4]/साकी इमामुरा(जपान)वि.वि.हुमेरा बहरमुस (भारत)/ऑलिव्हिया बर्गलर(पोलंड)6-4, 6-2;
फुना कोजाकी (जपान)/मिसाकी मात्सुदा(जपान) वि.वि.डायना मार्सिचेविका(लात्विया)/सॅपफो साकेल्लारिडी(ग्रीस)[1] 5-7, 6-4, 12-10;
एकतेरिना काझिओनोवा / एकतेरिना याशिना(रशिया)[3] वि.वि. झील देसाई (भारत)/ प्रांजला येडलापल्ली(भारत)0-6, 6-2, 10-6;
वैष्णवी आडकर (भारत)/ सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि. श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत)/वैदेही चौधरी(भारत)[2] 7-5, 6-3.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय