December 2, 2025

आंतरशालेय राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद २०२३ स्पर्धेत राज्यभरातून २४० खेळाडू सहभागी

पुणे, २३ डिसेंबर २०२३:  पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद २०२३ स्पर्धेत राज्यभरातून २४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी आणि इव्हॉल्व्ह स्क्वॅश कोर्ट, एनआयबीएम रोड येथे २४ ते २६ डिसेंबर २०२३ या कालावधीत रंगणार आहे.
महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांडरे यांनी सांगितले की, या स्पर्धेत पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर या ठिकाणाहून एकूण २४० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच, हि स्पर्धा  १३, १५,१७ वर्षाखालील मुले व मुली पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक व गुण देण्यात देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड आगामी पुणे येथे महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी स्क्वॅश कोर्ट, एनआयबीएम रोड येथे ९ जानेवारी २०२३ रोजी होणारी राष्ट्रीय आंतरशालेय स्क्वॅश अजिंक्यपद२०२४ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये आनंद लाहोटी, शिवाजी कोळी, सतीश पोतदार, रोहिदास गाडेकर, नकुल चव्हाण, ऋषिकेश बजाज यांचा सहभाग आहे.स्पर्धेचे उदघाटन ललिता बाबर,  क्रीडा उपसंचालक पुणेचे अनिल चोरमले, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता २४ डिसेंबर रोजी होणार आहे.