September 24, 2025

एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली व डायना मार्सिचेविका यांच्यात अंतिम लढत

सोलापूर, 23 डिसेंबर 2033: सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए 25000डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली, लात्वियाच्या डायना मार्सिचेविका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा यांनी विजेतेपद संपादन केले.

सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहज यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा 7-6(3), 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 1तास 59मिनिटे चालला

लात्वियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सिचेविकाने जपानच्या साकी इमामुराचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामना 1तास 8 मिनिटे चालला.

दुहेरीत अंतिम फेरीत जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिके वितरण इलीझियम क्लब लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरपवित सिंग, जमाश्री रिआल्टी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाने यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: एकेरी: महिला:
सहजा यमलापल्ली (भारत)[7]वि.वि.एकतेरिना मकारोवा(रशिया)[2]7-6(3), 6-2;
डायना मार्सिचेविका(लात्विया)[6]वि.वि.साकी इमामुरा(जपान)6-4, 6-2;

दुहेरी गट: अंतिम फेरी:
हिरोमी आबे(जपान)[4]/साकी इमामुरा(जपान)वि.वि.फुना कोजाकी (जपान)/मिसाकी मात्सुदा(जपान) 6-3, 6-1.