September 24, 2025

18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत अॅमडॉक्स, केपीआयटी संघांची विजयी सलामी

पुणे, 2 जानेवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद  स्पर्धेत साखळी फेरीत अॅमडॉक्स, केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
 
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सूरज गुप्ता(2-26) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर अॅमडॉक्स संघाने मास्टरकार्ड पुणे संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मास्टरकार्ड पुणे संघाने 20 षटकात 6बाद 138धावा केल्या. यात अभिजीत परिदा 40, शार्दुल कोंबडे 37, इमाम जाफर नाबाद 22, परिक्षित कांबळे नाबाद 16 यांनी धावा केल्या. अॅमडॉक्सकडून सूरज गुप्ता(2-26), अखिलेश शुक्ला(1 -16) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान अॅमडॉक्स संघाने 18 षटकात 4बाद 141धावा करून पूर्ण केले. यात शुभम कुकडे नाबाद 43, विकास जगदाळे नाबाद 37 विजयकुमार लोखंडे 19, अभिषेक पाटणकर 14 यांनी धावा काढून संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला. 
 
दुसऱ्या सामन्यात दत्तात्रय गाडे 2-18 व नाबाद 12)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केपीआयटी संघाने यार्डी संघाचा 3 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. 
 
संक्षिप्त धावफलक: साखळी फेरी:
मास्टरकार्ड पुणे: 20 षटकात 6बाद 138धावा(अभिजीत परिदा 40(27,4×4,2×6), शार्दुल कोंबडे 37(35,3×4), इमाम जाफर नाबाद 22, परिक्षित कांबळे नाबाद 16, सूरज गुप्ता 2-26, अखिलेश शुक्ला 1 -16)पराभुत वि.अॅमडॉक्स: 18 षटकात 4बाद 141धावा(शुभम कुकडे नाबाद 43(28,3×4,2×6), विकास जगदाळे नाबाद 37(22,4×4,2×6), विजयकुमार लोखंडे 19, अभिषेक पाटणकर 14, रमाकांत शिंदे 2-16, शार्दुल कोंबडे 1-20;सामनावीर-सूरज गुप्ता; अॅमडॉक्स संघ 6 गडी राखून विजयी;
 
यार्डी: 19.4 षटकात सर्वबाद 118धावा(आशू शेख 37(32,4×4,1×6), अमेय पाडे 35(32,1×4,2×6), विक्रम पाटील 14, दत्तात्रय गाडे 2-18, संतोष कंक 1-11)पराभुत वि. केपीआयटी:19.5 षटकात 7बाद 122धावा(फरझान शेख 37(26,5×4,1×6), सोमेश मर्दाने 26(32) सुधीर काळे नाबाद 16, दत्तात्रय गाडे नाबाद 12, विनोद अलट 11, आशु शेख 3-25, गौतम 2-15); सामनावीर – दत्तात्रय गाडे; केपीआयटी संघ 3 गडी राखून विजयी.