September 24, 2025

भारतीय सैन्यदलासाठी महावितरणच्या बंडगार्डन विभागात ७२ जणांचे रक्तदान

पुणे, दि. ०३ जानेवारी २०२४: महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत बंडगार्डन विभागामध्ये भारतीय सैन्यदलासाठी बुधवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

येथील सशस्त्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने बंडगार्डन विभाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धवल सावंत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू पवार, सतीश उमरजे, हितेंद्र भिरूड, संजय मालपे, उपकार्यकारी अभियंता फुलचंद फड, उपव्यवस्थापक शिल्पा बारापत्रे आदींसह ७२ जणांनी रक्तदान केले. यात आठ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हे विशेष. या शिबिरात कार्यकारी अभियंता अशोक जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, सुभेदार कुलदीप भदोरिया यांची उपस्थिती होती. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले यांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी बंडगार्डन विभागाचे कौतुक केले.