पुणे, ०३/०१/२०२४: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंत्तीनिमित्त उरुळी देवाची ग्रामस्थांच्या वतीने क्रांतीपिता महात्मा फुले यांच्या अखंडाचे सामुहिक गायन करण्यात आले .यावेळी महिला व शालेय मुलींनी सावित्रबाई फुले यांच्या कार्यावर आपले विचार व्यक्त करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी ,माजी सरपंच महानंदा ताई सातव ,माजी सरपंच लक्ष्मण आप्पा नेवसे ,माजी उपसरपंच सुनंदाताई भाडळे ,कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी उपसरपंच अतुल बहुले ,माजी सदस्य डॉ.सारीकाताई भाडळे ,सुरेखा जाधव ,आकाश बहुले ,प्रतीक बहुले ,अक्षय बहुले यासह ग्रामस्थ ,महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन