पुणे, 7 जानेवारी 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन आयटीए करंडक 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत लव परदेशी, हर्ष नागवानी, वाण्या अगरवाल, जान्हवी सावंत या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
खराडी येथील इंटेनसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात पाचव्या मानांकित लव परदेशीने सातव्या मानांकित विराज खानविलकरचा 7-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या मानांकित हर्ष नागवानीने अहान भट्टाचार्यचा टायब्रेकमध्ये 7-6(1) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित वाण्या अगरवाल हिने तिसऱ्या मानांकित शरण्या सावंत आव्हान 7-2 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित जान्हवी सावंतने चौथ्या मानांकित स्वरा पवारचा 7-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
निकाल: उपांत्य फेरी: 12 वर्षाखालील मुले:
लव परदेशी (5) वि.वि.विराज खानविलकर (7) 7-0
हर्ष नागवानी(3)वि.वि.अहान भट्टाचार्य 7-6(1);
हर्ष नागवानी(3)वि.वि.अहान भट्टाचार्य 7-6(1);
12 वर्षांखालील मुली:
वाण्या अगरवाल(1)वि.वि.शरण्या सावंत(3) 7-2;
जान्हवी सावंत(2)वि.वि.स्वरा पवार(4) 7-0.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय