September 24, 2025

पुणे : राजकीय व्यंगचित्रे मांडण्यासाठी “बलकडू 2” व्यंगचित्र प्रदर्शन; खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, 9 जानेवारी 2024: राजकीय टोले देण्यासाठी व मनोरंजनासाठी “बाळकडू” व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त होणार. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.

निमंत्रक अनंत रामचंद्र घरत, प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना पुणे यांनी सांगितले की शिवसेना पक्षात झालेल्या घडामोडी, पक्ष फुटी आणि एकंदरीत शिवसेना आणि सत्तेसाठी लालची राजकारण्यांचे व्यंगचित्र “बाळकडू २” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त करण्यात येत आहे.

बाळकडू 2″ व्यंगचित्र प्रदर्शन हा महाराष्ट्रात मागील वर्षात राजकीय उलथापालथीवर कुंचल्याच्या माध्यमातून ओढलेला आसूड असून व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी ही व्यंगचित्र रेखाटली आहेत. बालगंधर्व कलादालन येथे या व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक १६ ते १८ जानेवारी रोजी होणार असून याचे आयोजन शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अंनत घरत यांनी केले आहे .

याचे उदघाटन दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतील शहर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत .