September 24, 2025

67व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत सान्वी बक्षी, अद्रिका डे, अहाना सिंग यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

पुणे, दि. 11 जानेवारी 2024 – महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी यांच्या वतीने आयोजित व इंडियन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या 67 व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सान्वी बक्षी, अद्रिका डे, आश्रित पसरेचा, अहाना सिंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

उंड्री येथील संपूर्णपणे काचेच्या महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दिल्लीच्या सान्वी बक्षीने गुजरातच्या मान्या वालियाचा 15-02 असा तर, दिल्लीच्या अहाना सिंगने चंदीगडच्या प्रकृती चंद्राकरचा 15-10 असा पराभव दुसरी फेरी गाठली. आसामच्या अद्रिका डे हिने दिल्लीच्या जसनूर कौरवर 15-04 असा विजय मिळवला. गोव्याच्या आश्रित पसरेचाने तामिळनाडूच्या रक्षा डीचे आव्हान 15-02 असे संपुष्टात आणले.

सांघिक गटात उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात विवान खन्ना, अयान दलाल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने गुजरात संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. चुरशीच्या लढतीत मध्य प्रदेश संघाने छत्तीसगड संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून सारांश पाटील, दक्ष फिरोदिया यांनी सुरेख कामगिरी केली.

निकाल: वैयक्तिक गट: 14 वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
मांडवी घोष (गोवा)वि.वि.यादवी लोटिया(गुजरात) 15-07;
प्रियांशी मेवारा (आयपीएससी)वि.वि.वान्या सिंग पुनिया (मध्यप्रदेश) 15-01;
एलिझा सी (तामिळनाडू)वि.वि.एम. मेरी सेल्वी (विद्याभारती) 15-13;
नुशरथ थबास्सुम (तेलंगणा)वि.वि.प्रिया गुगुलाथू (तेलंगणा) 15-01;
सान्वी बक्षी (दिल्ली)वि.वि.मान्या सावलिया(गुजरात) 15-02;
अद्रिका डे (आसाम)वि.वि.जसनूर कौर (दिल्ली) 15-04;
आश्रित पसरेचा(गोवा)वि.वि.रक्षा डी(तामिळनाडू) 15-02;
अहाना सिंग(दिल्ली)वि.वि.प्रकृती चंद्राकर(चंदीगड) 15-10;

सांघिक गट: 14 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
महाराष्ट्र वि.वि.गुजरात 2-0 (विवान खन्ना वि.वि.हेतांश कलाविया 11-05; अयान दलाल वि.वि.हरमनदीप ठाकूर 11-02, 11-07);

मध्य प्रदेश वि.वि.छत्तीसगड 2-1(सारांश पाटील वि.वि.जयवर्धन सिंग 11-06, 13-11; आरव लोहिया पराभुत वि.दिव्यानी उपाध्याय 03-11, 07-11; दक्ष फिरोदिया वि.वि.सूर्यांश मिश्रा 11-02, 11-01)

चंदीगड वि.वि.सीबीएससी 2-0 (रेहान वि.वि.ऋषभ भागवत 06-11, 11-08, 11-09; अनहद सिंघू पुढे चाल वि.स्वारित पाटील);

तमिळनाडू वि.वि.आयबीएसएसओ 2-1(दर्शन वि.वि.
रेयांश छेडा 09-11, 11-03, 11-04; दिनेश पराभुत वि.रुद्रप्रताप सिंग 09-11, 03-11; लोकेश वि.वि.धनविन श्रॉफ 11-05, 11-02);

14 वर्षाखालील मुली:
आयबीएसएसओ वि.वि.दिल्ली 2-1(अमायरा मेहता पराभुत वि.आहाना सिंग 03-11, 05-11; छवी पांचाल वि.वि.निरंजना नायर 11-05, 11-04; कियारा गुप्ता वि.वि.जसनूर कौर 11-04, 11-03;

तामिळनाडू वि.वि.गुजरात 2-1(नितीया श्री वि.वि.त्रिशा देसाई 11-02, 11-05; एलिझा पराभुत वि.यादवी लाटिया 03-11, 06-11; वैशालिनी वि.वि.मान्या सावलिया 13-11, 11-04;

आयपीएससी वि.वि.चंदीगड 2-0 (प्रियांशी मेवगा वि.वि.
साक्षी 11-05, 11-05; आदित्री भट्टाचार्जी वि.वि.अक्क्षा 11-07, 11-03);

महाराष्ट्र वि.वि.आसाम 2-0 (वसुंधरा नागरे वि.वि.मनश्री राऊत 11-08, 11-08; दीपशिखा थोरात वि.वि.अद्रिका डे 11-03, 11-02;

17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:
तामिळनाडू वि.वि.छत्तीसगड 2-0 (इजाज मोहम्मद वि.वि.यश सोनवानी 11-01, 11-05; लक्ष्मण हरी वि.वि.रेयांश कुलश्रेष्ठ 11-05, 06-11, 12-10);

आयबीएसएसओ वि.वि.आयपीएससी 2-1(आदित्य के पराभुत वि.परितोश कोहली 06-11, 11-04, 11-13; उदित मिश्रा वि.वि.प्रखर लोहिया 11-01, 11-05; दर्श चौधरी वि.वि.युवादित्य जैन 11-05, 11-04);

महाराष्ट्र वि.वि.मध्य प्रदेश 2-0(आदित्य घोडके वि.वि.नॉयल मसिही 11-06, 11-01; रिधांश शहा वि.वि.समज सलुजा 11-01, 11-03);

दिल्ली वि.वि.झारखंड 2-0 (साहिर सेठी वि.वि.अमन सिन्हा 11-00, 11-04; अर्णव खंडेलवाल वि.वि.रेवंत पटेल 11-02, 11-04);

19 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
महाराष्ट्र वि.वि. गुजरात 2-0 (रेवा निंबाळकर वि.वि.प्रियांशी अदेसरा 11-01, 11-01; हावरा भानापूरवाला वि.वि.कलाश्री दवे 11-01, 11-02);

आयपीएससी वि.वि.तामिळनाडू 2-0(यशी जैन वि.वि.अमृता राजलक्ष्मी 11-07, 11-02; दीत्या वंगानी वि.वि.अँस्लिन डोना 11-00, 11-02);

मध्यप्रदेश वि.वि.छत्तीसगड 2-0 (जन्नत खान वि.वि.मनीशा मांडवी 11-07, 11-03; प्रियांशी पटेल वि.वि.दामिनी नेताम 11-00, 11-01);