छत्रपती संभाजी नगर, दि 14 जानेवारी 2024: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात नीरज जोर्वेकर, समयु जैन, माधव दढीच, हेरंब पोहाने यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात नीरज जोर्वेकर याने अहाना पाटीलचा 6-0,7-5 असा तर, समयु जैनने आर्यन बॅनर्जीचा 6-4, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. माधव दढीचने अयान जैनचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून मुख्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. हेरंबा पोहाणेने आदिराज ब्रम्हनाथकरचा 6-2, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेतील मुख्य ड्रॉ मधील खेळाडूंची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शौनक सुवर्णा याला अग्रमानांकन देण्यात आले. तर, मुलींच्या गटात ओडिशाच्या अहाना हिला अव्वल मानांकन देण्यात आले.
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
नीरज जोर्वेकर(भारत) वि.वि.अहाना पाटील(भारत) 6-0, 7-5;
हेरंबा पोहाणे(भारत) वि.वि.आदिराज ब्रम्हनाथकर(भारत) 6-2, 6-4;
समयु जैन (भारत) वि.वि.आर्यन बॅनर्जी(भारत) 6-4, 6-0;
माधव दढीच(भारत) वि.वि.अयान जैन(भारत) 6-1, 6-1;
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले: 1.शौनक सुवर्णा, 2.इशान येडलापल्ली, 3.इशान सुदर्शन, 4.इशान बडगी, 5.वरद उंद्रे, 6.संजय गिरीशकुमार, 7.वीर वडोदराई, 8.मनन राय;
मुली: 1.अहाना, 2.श्रीनिती चौधरी, 3.शिबानी गुप्ते, 4.कार्तिका पद्मकुमार, 5.वृंदिका राजपूत, 6.संयुक्त कृष्णन, 7.जान्हवी पम्मिनेदी, 8.आहाना दास.
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय