September 24, 2025

पुणे: पहिली ब्राम्हण क्रिकेट लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; कृष्णा लिजंड्स, नर्मदा रायडर्स, ब्रम्हपुत्रा वॉरीयर्स, बियास ब्रावोस संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे, १६ जानेवारी २०२४: एजीएएस स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ब्राम्हण क्रिकेट लीग स्पर्धेत कृष्णा लिजंड्स, नर्मदा रायडर्स, ब्रम्हपुत्रा वॉरीयर्स आणि बियास ब्रावोस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्धघाटनाचा दिवस गाजवला.

कटारीया हायस्कूल, मुकूंदनगर आणि प्लॅटिनम स्पोर्ट्स क्लब, वाडे बोल्हाई येथील मैदानावर झालेल्या सामन्यात नचिकेत कुलकर्णी याच्या ६५ धावांच्या जोरावर कृष्णा लिजंड्स संघाने मुठा सह्यांद्री शिलेदार संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. मुठा सह्यांद्री शिलेदार संघाच्या १५२ धावांचे लक्ष कृष्णा लिजंड्स संघाने सहज पार केले. नचिकेत कुलकर्णी याने ६५ धावा तर, किरण दातार याने ६२ धावांची खेळी केली. या दोघांनी ८० चेंडूत १३४ धावांची दमदार भागिदारी केली.

मिहीर ओक याच्या नाबाद १०० धावांच्या जोरावर नर्मदा रायडर्स संघाने कोयना किक् संघाचा ७९ धावांनी सहज पराभव केला. मिहीरने स्पर्धेतील पहिले शतक नोंदवित संघाचा विजय साकार केला. निरज दिक्षीत याच्या फलंदाजीच्या जोरावर ब्रम्हपुत्रा वॉरीयर्सने इंड्स सुपरहिरोज् संघाचा ६ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. मयुर गोखले याच्या ८८ धावांच्या जोरावर बियास ब्रावोस संघाने वशिष्ठ युनिटी फाऊंडेशन संघाचा २८ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

याआधी स्पर्धेचे उद्धघाटन स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गिरीष ओक, अमित उमरीकर, आदित्य पाळंदे आणि शंतनु आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
मुठा सह्यांद्री शिलेदारः २० षटकात ७ गडी बाद १५२ धावा (श्रीकांत पानसे ३०, सुयश भट ३७, क्षितीज आपटे नाबाद २०, संजय इनामदार ३-३०, पराग केळकर २-१४) पराभूत वि. कृष्णा लिजंड्सः १५.२ षटकात २ गडी बाद १५४ धावा (नचिकेत कुलकर्णी ६५ (४३, ९ चौकार, २ षटकार), किरण दातार ६२ (४१, ७ चौकार, २ षटकार);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी नचिकेत आणि किरण १३४ (८०); सामनावीरः नचिकेत कुलकर्णी;

नर्मदा रायडर्सः २० षटकात ७ गडी बाद १६६ धावा (मिहीर ओक नाबाद १०० (६०, ११ चौकार, ४ षटकार), कृष्णा भट १३, अमन शुक्ला ३-२१) वि.वि. कोयना किक्ः १५.५ षटकात १० गडी बाद ८७ धावा (अजित भिंगे २५, गणेश जोशी १९, मिहीर ओक ४-१७, कृष्णा भट २-१२); सामनावीरः मिहीर ओक;

इंड्स सुपरहिरोज्ः २० षटकात ७ गडी बाद १४२ धावा (अर्थव कुलकर्णी ५४, हृषीकेश आगाशे ३२, गौरव कर्वे १९, आदित्य पाळंदे १-८) पराभूत वि. ब्रम्हपुत्रा वॉरीयर्सः १५.२ षटकात ४ गडी बाद १४३ धावा (निरज दिक्षीत ६० (४४, ६ चौकार), आयुष देव नाबाद ४२ (२७, ४ चौकार, १ षटकार), हृषीकेश आगाशे २-२५); सामनावीरः निरज दिक्षीत;

बियास ब्रावोसः २० षटकात ७ गडी बाद १६७ धावा (मयुर गोखले ८८ (५०, ११ चौकार, ३ षटकार), शंतनु आठवले २१, भुषण देशपांडे ३-३०, अनिल मांडके २-२३) वि.वि. वशिष्ठ युनिटी फाऊंडेशनः २० षटकात ९ गडी बाद १३९ धावा (ओजस साठे ३१, अनिल मांडके २६, मयुर गोखले ३-१३, केतन बापट २-१६); सामनावीरः मयुर गोखले;