September 24, 2025

१० व्या वसंतोत्सव पुरस्कारांची घोषणा

पुणे, दि. १६ जानेवारी, २०२४ : ‘वसंतोत्सव’ या संगीत महोत्सवात दर वर्षी तीन पुरस्कार दिले जातात. ज्येष्ठ गायक स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार वा गुरु, संगीत संशोधक वा लेखक आणि उदयोन्मुख कलाकार अशा तीन व्यक्तींना ‘वसंतोत्सव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

यंदा पुरस्काराचे हे १० वे वर्षे असून यावर्षी या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी मीरा पणशीकर, ध्वनिमुद्रिका अभ्यासक संजय संत, आणि युवा हार्मोनियम वादक यशवंत थिट्टे या तिघांची निवड करण्यात आली आहे. कलाकार व संशोधक यांना मानपत्र व रोख ५१,००० रुपये तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २१,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वसंतोत्सवच्या तिसऱ्या दिवशी, रविवार दि. २१ जानेवारी, २०२४ रोजी या पुरस्कारांचे वितरण संपन्न होईल, अशी माहिती आयोजकांनी कळविली आहे.