September 24, 2025

एमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वरद उंद्रे, शिवराज जाधव यांची आगेकूच

छत्रपती संभाजी नगर, दि 17 जानेवारी 2024: एन्ड्युरन्स तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या वरद उंद्रे, औरंगाबादच्या शिवराज जाधव याने या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत शिवराज जाधवने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत आठव्या मानांकित मनन रायचा 5-7, 6-2, 6-2 असा पराभव केला. पाचव्या मानंकित वरद उंद्रेने दुसऱ्या मानांकित ईशान येडलापल्लीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित शौनक सुवर्णने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दैविक कालवकुंताचे आव्हान 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले.

मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित शिबानी गुप्तेने धनवी कांजीतंडाला 6-1, 6-0 असे पराभूत केले. अव्वल मानांकित आहाना ए. हिने मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या रीत अरोराचा 6-3, 6-4 असा पराभव केला. चौथ्या मानांकित कार्तिका पद्मकुमारने पाचव्या मानांकित वृंदिका राजपूतवर 6-4, 6-0 असा विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित श्रीनिती चौधरीने आठव्या मानांकित अहाना दासचा 6-0, 6-1 असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

निकाल: मुले: उपांत्यपूर्व फेरी: मुख्य ड्रॉ:
शौनक सुवर्ण(भारत)[1]वि.वि.दैविक कालवकुंता(भारत) 6-3, 6-1;
ऋन्मान महेश एस ( भारत)वि.वि. स्मित उंद्रे(भारत) 5-7,6-3,6-2;
शिवराज जाधव(भारत)वि.वि. मनन राय (भारत) [8]5-7, 6-2, 6-2;
वरद उंद्रे ( भारत) [5] वि.वि.ईशान येडलापल्ली(भारत) [2] 6-3, 6-2;

मुली:
शिबानी गुप्ते(भारत)[3]वि.वि.धनवी कांजीतंडा( भारत)6-1, 6-0;
आहाना ए. (भारत)[1]वि.वि.रीत अरोरा (भारत) 6-3, 6-4;
कार्तिका पद्मकुमार(भारत) [4]वि.वि.  वृंदिका राजपूत (भारत) [5]6-4, 6-0;
श्रीनिती चौधरी (भारत)[2]वि.वि. अहाना दास (भारत)[8]6-0, 6-1;