September 24, 2025

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, दि.17 जानेवारी2024 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत  सुशांत अभंग (101धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीविरुध्दपहिल्या डावाच्या(241 धावा)अधिक्याच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या क्रिकेट मैदानावरील दोन दिवसीय उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा आज 56 षटकात 6बाद 241धावापासून खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल पीवायसीच्या आर्य पानसे(2-19), स्वराज चव्हाण(2-17), वरुण चौधरी(2-13), निखिल लुणावत(2-21), अथर्व निमजे(2-22) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा पहिला डाव 33.1 षटकांत सर्वबाद 92धावावर संपुष्ठात आला. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 86 षटकात सर्वबाद 333धावा करून पहिल्या डावात 241 धावांची आघाडी मिळवली. यात सुशांत अभंगने सुरेख फलंदाजी करताना 100चेंडूत 14चौकार व 1षटकाराच्या मदतीने 101 धावांची शतकी खेळी केली. त्याला सय्यद सुफयानने संयमी खेळी करत 130चेंडूत 8चौकाराच्या मदतीने 56 धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 189चेंडूत 126 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. हे बाद झाल्यावर ओंकार थोरातने 122चेंडूत 9 चौकार व 3षटकारसह नाबाद 69धावा केल्या. ओंकार व वरुण चौधरी (23धावा) यांनी सातव्या गड्यासाठी 103चेंडूत 57धावांची भागीदारी केली. व्हेरॉककडून कार्तिक शेवाळे(5-75), सुश्रुत शेवाळे(3-45), ओंकार राजपूत(1-51)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
 
दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आज दिवस अखेर 58षटकात 8बाद 298धावा केल्या. यात अभिन अमिताभने 78चेंडूत 12चौकार व 3 षटकारासह 80धावा, तर अथर्व औटीने 119चेंडूत 19चौकारासह 79 धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गडयासाठी  116 चेंडूत 79 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अथर्व याने ओमकार राजपूत(55धावा)च्या साथीत 51 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून आर्य पानसे(4-84), स्वराज चव्हाण(2-37) यांनी अचूक गोलंदाजी केली. सामना अनिर्णित राहिल्यामुळे पीवायसी हिंदु जिमखाना पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला.
 
धावफलक: उपांत्य फेरी: पहिला डाव: 
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीः 33.1 षटकांत सर्वबाद 92धावा(अथर्व औटे 31(59,3×4,1×6), ओम भाबड 16, नारायण डोके 16, ओंकार राजपूत 10, आर्य पानसे 2-19, स्वराज चव्हाण 2-17, वरुण चौधरी 2-13, निखिल लुणावत 2-21, अथर्व निमजे 2-22) वि. पीवायसी हिंदू जिमखाना:86 षटकात सर्वबाद 333धावा (सुशांत अभंग 101(100,14×4,1×6), सय्यद सुफयान 56(130,8×4), साईराज चोरगे 29, निखिल लुणावत 22, ओंकार थोरात नाबाद 69(122,9×4,3×6), वरुण चौधरी 23, सुश्रुत शेवाळे 3-45, कार्तिक शेवाळे 5-75, ओंकार राजपूत 1-51); पीवायसी संघाकडे पहिल्या डावात 241 धावांची आघाडी;
 
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीः 58षटकात 8बाद 298धावा(अभिन अमिताभ 80(78,12×4,3×6), अथर्व औटी 79(119,19×4), ओमकार राजपूत 55(27,5×4,4×6), अथर्व काळे 13, कार्तिक शेवाळे 24, आर्य पानसे 4-84, स्वराज चव्हाण 2-37) वि.पीवायसी हिंदु जिमखाना: .सामना अनिर्णित; पीवायसी संघ पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी.