छत्रपती संभाजी नगर, दि 18 जानेवारी 2024: एन्ड्युरन्स तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या वरद उंद्रे, कोल्हापूरच्या शौनक सुवर्णा याने, तर मुलींच्या गटात आहाना ए., कार्तिका पद्मकुमार यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानंकित वरद उंद्रेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या औरंगाबादच्या शिवराज जाधवचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात अव्वल मानांकित शौनक सुवर्णने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत ऋन्मान महेश एसचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(1) असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आहाना ए. हिने तिसऱ्या मानांकित शिबानी गुप्तेचा 6-0, 7-6(1) असा तर, चौथ्या मानांकित कार्तिका पद्मकुमारने दुसऱ्या मानांकित श्रीनिती चौधरीचा 7-5, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात स्मित उंद्रे व वरद उंद्रे यांनी तिसऱ्या मानांकित नमन बोराह व धीर वडोदरिया यांचा 6-0, 6-1 असा तर, चौथ्या मानांकित अरमान दुआ व मनन राय यांनी ऋन्मान महेश एस व पुगसेव्हेल प्रकाशयांचा 1-6, 6-1, 10-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
निकाल: मुले: उपांत्य फेरी: मुख्य ड्रॉ:
शौनक सुवर्णा(भारत)[1]वि.वि.ऋन्मान महेश एस(भारत)6-1, 7-6(1);
वरद उंद्रे ( भारत) [5] वि.वि.शिवराज जाधव(भारत) 6-0, 6-0;मुली:
आहाना ए. (भारत)[1]वि.वि.शिबानी गुप्ते(भारत)[3] 6-0, 7-6(1);
कार्तिका पद्मकुमार(भारत) [4]वि.वि.श्रीनिती चौधरी (भारत)[2]7-5, 6-0;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
स्मित उंद्रे (भारत)/ वरद उंद्रे(भारत)वि.वि.नमन बोराह (भारत)[3] /धीर वडोदरिया (भारत)6-0, 6-1;
अरमान दुआ (भारत)/मनन राय(भारत)[4]वि.वि.ऋन्मान महेश एस(भारत) /पुगसेव्हेल प्रकाश (भारत)1-6, 6-1, 10-5;
शौनक सुवर्ण (भारत)/ईशान यडलापल्ली (भारत)[1] वि.वि.आदिराज ब्रम्हनाथकर (भारत)/ हेरंबा पोहाणे(भारत)6-3, 6-3;
इशान बडागी(भारत)[2]/इशान सुदर्शन (अमेरिका)वि.वि.जय गायकवाड(भारत)/संजय गिरीश कुमार(भारत)6-1, 6-4;

मुली:
संयुक्त कृष्णन (भारत)/ दीप्ती वेंकटेशन(भारत)[4] वि.वि.समर्थ मोरे(भारत)/ध्रुविका त्रिभुवन(भारत) 6-0, 6-0;
शिबानी गुप्ते (भारत)[2] /वृंदिका राजपूत (भारत)वि.वि.आयशा बागला (भारत)/आहाना दास(भारत)6-0, 6-1;
आहान ए. (भारत)/कार्तिका पद्मकुमार(भारत)[1]वि.वि.अक्षरी (भारत)/रिया कुलकर्णी (भारत)6-2, 6-0;
श्रीनिती चौधरी (Iभारत) [३] /जान्हवी तम्मिनेदी (भारत)वि.वि.रित्सा कोंडकर(भारत)/मायरा टोप्नो (भारत)6-0, 6-3;

More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय